आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदीघोडे नाचवते सोलापूर पालिका; पोलिसांचे एकमेकांकडे बोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील चौकांमधील सिग्नल दिवे शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत. ते सुरू करण्याची इच्छा महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांची नाही. त्याच्या किरकोळ दुरुस्तीसाठी कागदी घोडे नाचवत एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम दोन्ही प्रशासन करत आहेत. जबाबदारी झटकण्याची भूमिका प्रशासनाची असून याकामी ते गंभीर नाहीत.

अकरा चौकांत सिग्नल दिवे आहेत. किरकोळ कारणासाठी ते चालू होत नसल्याची तक्रार पोलिसांची आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाकडून दिवे सुरू असल्याचे सांगण्यात येते. मागील पंधरा दिवसांपासून हीच उत्तरे, हीच टोलवाटोलवी सुरू आहे. शांती चौकातील सिग्नल दिव्यांची तपासणी मागील सोमवारी झाली. पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी टायमर सेटिंग करून दिवे सुरू केले आहेत. त्यांच्या विभागात आम्रपाली चौक, जुना बोरामणी नाका, शांती चौक हे दोन चौक येतात. दक्षिण विभाग वाहतूक शाखेत संत तुकाराम चौक, सिव्हिल चौक, डफरीन, रगंभवन, सरस्वती चौक, जुना होटगी नाका, आसरा, पत्रकार भवन हे चौक येतात. त्यापैकी डफरीन व सरस्वती चौकात दिवे सुरू आहेत. अन्य चौकातील दिवे पोलिस चालूच करत नाहीत.

औरंगाबाद : एखाद्या चौकातील दिवा बंद पडला, किरकोळ दुरुस्ती असल्यास वाहतूक पोलिसांकडून विद्युत विभागाला लेखी कळवण्यात येते. त्याची दखल घेत एक दिवसात दुरुस्ती होते.
पुणे : येथील सिग्नल दिव्यांचा देखभाल, दुरुस्ती खर्च महापालिका करते. दिव्यांची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे पथक आहे. नादुरुस्त दिवे तत्काळ दुरुस्त करण्यात येतात. पोलिसांच्या सूचनांची अंमलबजावणी, नागरिकांची मागणीही विचारात घेतली जाते. सिग्नल दिवे सुरू करण्यासाठी महापालिका तत्पर आहे.
नाशिक : दोन तासांच्या आत बंद दिवे सुरू करण्यात येतात. दिव्यांची महत्त्वाची दुरुस्ती किंवा साहित्य मिळत नसल्यास दोन-तीन दिवसांत दिवे चालू होतात. पण, पोलिसांनी माहिती देताच महापालिका विद्युत विभाग दखल घेते, हे विशेष. दोघांमध्ये समन्वय चांगला आहे.

आयुक्तांची बैठकही नावालाच
पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी वाहतूक पोलिस व महापालिका विद्युत विभागाचे अधिकारी यांची मागील गुरुवारी बैठक घेतली. दिवे सुरू करण्यासाठी सूचना दिल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्षच झाले आहे.

मनपाकडून मिळत नाही प्रतिसाद

नाशिक, औरंगाबदमध्ये होते
नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई या शहरांत सिग्नल दिवे व्यवस्थित सुरू आहेत. महापालिकेचे त्यासाठी स्वतंत्र बजेट आहे. सोलापुरात बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरण करा) या तत्त्वावर दिवे बसवण्यात आले.

अशी ही टोलवाटोलवी
पोलिस म्हणतात दिव्यांचे काम अर्धवट आहे. तर महापालिका म्हणते दिवे सुरू आहेत, पण काही असो दिवे चालू करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा. त्यात काही त्रुटी असतील तर दुरुस्त करून घ्याव्यात.

पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये सिग्नल दिव्यांबाबत महापालिका व वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय चांगला आहे. एका दिवसात दिवे सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करते.
पुणे, नाशिक सारखे सोलापुरात का होत नाही..

फॉलोअप
सोमवारी सकाळी जुना होटगी नाका चौकातील सिग्नलची पाहणी करण्यात आली. तेथे पिवळा दिवा सुरू असल्याचे दिसले नाही. सिग्नल दिवे ताब्यात देण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेला पत्रव्यहार केला आहे. त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही.’’ अभिजित मोहिते, पोलिस निरीक्षक, दक्षिण विभाग