आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात लोकप्रतिनिधी घेणार सिग्नलसाठी पुढाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील सिग्नल दिवे सुरू करण्यासाठी माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरेसवक यू. एन. बेरिया, महापालिका विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांनी महापालिका आयुक्त अजय सावरीकर, वाहतूक पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधून दिवे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती बुधवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. गेल्या 20 दिवसांपासून शहरातील सिग्नल सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. किरकोळ दुरुस्ती, टायमर सेटिंगच्या कारणांवरून सिग्नल बंद आहेत.

पुणे, पिंपरी- चिंचवड शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहात बुधवारी पुणे पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, सर्वपक्षीय आमदार, शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. पोलिस दलाचे सक्षमीकरण करण्यात येणार असून, वाहतूक शाखेत अतिरिक्त पोलिस आयुक्त, दोन उपायुक्तांची नेमणूक केली जाणार आहे. सोलापुरातही असे प्रयत्न होण्याची गरज आहे.

कोण काय म्हणाले..
रोहिणी तडवळकर, विरोधी पक्षनेत्या : वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सिग्नलची गरज आहे. वाहने भरधाव असतात. अपघात सातत्याने होत आहेत. चौकांमध्ये सिग्नलची आवश्यकता आहे. सिग्नल दिवे सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांशी बोलणार आहे. सातत्याने पाठपुरावा करून
दिवे सुरू करण्यास भाग पाडू.
अँड. यू. एन. बेरिया, नगरसेवक : शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. सिग्नल दिवे सुरू करण्यासाठी महापौर, आयुक्त, विद्युत विभाग, वाहतूक पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधून पाठपुरावा करू. विद्युत विभागाने खर्चाची काळजी न करता लोकांच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी.
प्रकाश पाटील, पोलिस निरीक्षक (उत्तर विभाग) : शांती चौकात टाइम सेटिंगचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूंनी म्हणजे हैदराबाद व अक्कलकोट रस्त्यावरून अवजड वाहने येतात. नेमके त्यासाठी टायमिंग सेटिंग कसे करावे, याचा अभ्यास सुरू आहे. आम्रपाली चौकातील दिवे लवकरच सुरू करू.