आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीव्हीपीचे ‘वाहतूक मॉडेल सिग्नल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सिग्नल चौकात सिग्नल तोडून पुढे गेला तर आपल्या बँक अकाऊंट मधून आपाओपच दंडाची रक्कम कपात होईल. पोलिसही आपल्या घरी येऊन थेट आपल्यावर कारवाई करू शकतात. हे सिग्नल मॉडेल तंत्रज्ञान विकसित केले आहे सोरेगाव जवळील विद्या विकास प्रतिष्ठान (व्हीव्हीपी) अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी. हे मॉडेल जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनाही आवडले आहे. हे मॉडेल शहरात विकसित करता येईल का, यासाठी शनिवारी विद्यार्थ्यांंशी संवाद साधून माहिती जाणून घेणार आहेत.
गड्डा यात्रेतील कृषी प्रदर्शनात हे मॉडेल ७२ नंबर स्टॉलवर नागरिकांना पाहता येईल. रस्ता सुरक्षा सप्ताहअंतर्गत कॉलेजात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी पोलिस उपायुक्त अश्विनी सानप, निरीक्षक अरुण वायकर, यशवंत शिर्के यांची उपस्थिती होती. या सिग्नल मॉडेलची माहिती त्यांना देण्यात आली. मंजुरीसाठी प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ऐश्वर्या सोमा, विजयकुमार स्वामी, निकिता गंगावती, सोनाली वाघमारे. गाईड म्हणून प्रा. एल. बी. चौगुले यांनी काम पाहिले आहे.
1 चौकातीलचारही बाजूला वाहनांची गर्दी असते. ज्या बाजूला वाहतूक कमी असेल त्या दिशेला लाल दिवा लागेल. म्हणजे वाहनांच्या फ्लोनुसार दिवा लागेल.
2सिग्नलचौकात गर्दी असेल, गोंधळ सुरू असेल, जनावरांनी चौकात ठिय्या मांडला असेल तर त्याची माहिती वाहतूक शाखेत अलार्मद्वारे पोलिसांना मिळणार.
3सिग्नलचास्वीच ‘आॅन-आॅफ’ कोणी गंमत म्हणून केल्यास त्याचे चित्रीकरणही सर्व्हरच्या माध्यमातून वाहतूक िनयंत्रण शाखेच्या पोलिसांना पाहता येईल.
4नवीनदुचाकी घेताना आपले बँक अकाऊंट, त्यात ठरावीक रक्कम ठेवल्यानंतरच आरटीओ पासिंग करतील. नियम तोडल्यास बँकेतून पैसे कपात होतील.
काय आहे मॉडेल सिग्नल
सिग्नलचौकात सीसीटीव्ही बसविण्यात येतील. सिग्नल तोडून पुढे गेल्यास आपला नंबर सीसीटीव्हीत स्कॅनिंग होईल. ही माहिती वाहतूक शाखा आरटीओ विभागाच्या सर्व्हेरला अपलोड होईल. बँक खात्यामधून दंड वाहतूक शाखेच्या खात्यात जमा होईल.
भविष्यात हे यंत्र विकसित करण्याचा प्रयत्न
कुठल्याहीतलावात जलपर्णी वाढल्यानंतर ते काढण्यासाठी मोठा खर्च येतो. जलपर्णी मशीनद्वारे काढण्यासाठी एक यंत्र आमच्या विद्यालयाकडून विकसित करण्यात येत आहे. त्याचा अभ्यास सुरू असल्याची माहिती प्रा. एल. बी. चौगुले यांनी दिली. मॉडेल सिग्नल जलपर्णी प्रोजेक्टसाठी प्राचार्य एस. एम. शेख, संस्थेचे सचिव अमोल चव्हाण, अध्यक्ष जी. के. देशमुख यांचे सहकार्य मिळतेय.