आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर ते मुंबई रेल्वे प्रवास बसपेक्षाही महागडा; 14.2 टक्के भाडेवाढीमुळे प्रवाशांना दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे तिकीट दरात वाढ झाल्याने सोलापूर ते मुंबई प्रवास खासगी एसी बसपेक्षा महागडा होणार आहे.रेल्वेने केलेल्या 14.2 टक्के दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे रेल्वे प्रवासाचे गणित बिघडणार आहे. सध्या मुंबई साठी खासगी एसी बसचे तिकीट 600 रुपये आहे, तर रेल्वे थ्री टायर एसीचे तिकीट 770 पर्यंत गेले आहे.

सध्या सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी सोलापूरकरांच्या हक्काच्या दोन रेल्वेगाड्या तर सोलापूर ते पुणे प्रवासासाठी दोन गाड्या उपलब्ध आहेत. यातून सुमारे आठ हजार प्रवासी दररोज ये-जा करतात. मुंबईसाठी थ्री टायर एसीसाठी 675 रुपये मोजावे लागत होते. हे भाडे खासगी बसएवढेच होते. आता झालेल्या भाडेवाढीमुळे 770 पर्यंत तिकीट दर झाल्याने याचा फटका खासगी बसच्या तिकीट दर वाढीतही नजिकच्या काळात होईल. पूर्वी रेल्वेचा प्रवासात स्वस्तात सुरक्षितता होती. मात्र, रेल्वेने वर्षभरात दोनवेळा दरवाढ करून सर्वसामान्य प्रवाशांना दणका दिला आहे.
४गेल्या दहा वर्षांत न झालेली प्रवासी दरातील वाढ नव्या सरकारने सूत्रे हाती घेताच केली. ती टाळता आली असती.

मुजझर बागलकोटे
४ रेल्वेकडून अचानक करण्यात आलेली दरवाढ अपेक्षित नव्हती. गेल्या दहा वर्षात रेल्वेने प्रवासी तिकिटांचे दर वाढवले नव्हते.

वर्षा अतनुरे, गृहिणी
४दरवाढीबाबत सर्वसामान्य प्रवाशांच्या भावना तीव्र अशाच आहेत. झालेली दरवाढ मागे घेण्यात यावी. यामुळे साहजिकच महागाईही वाढेल.
नितीन नवगिरे, सचिव, रेल्वे प्रवासी संघटना
तिकीट दरात एकदम 14 टक्के केलेली वाढ योग्य नाही. ही दरवाढ सर्वसामान्य प्रवाशांना निश्चित असह्य अशीच आहे.
रविकांत शिंदे
मालवाहतुकीच्या दरातही केलेली वाढ महागाईस आमंत्रण देणारी ठरेल. अनेक गोष्टीही महाग होऊ शकतील.
वीरभद्र अतनुरे
४यूपीए सरकार बदलले, एनडीए सरकार आले. दरवाढीचा निर्णय नव्या सरकाने लोकांच्या मतांचा विचार न करता घेतला. याबाबत संघटना निवेदनही देणार आहे.
राजाभाऊ जाधव, अध्यक्ष, प्रवासी संघटना
वर्ग जुने दर - नवे दर

अनारक्षित : रू. 137 - रू. 157
स्लिपर क्लास रू. 265 - रू. 302
ए सी थ्री टायर : रू. 675 - रू. 770
एसी टु टायर : रू. 945 - रू. 1080
एसी फर्स्टक्लास : रू. 1590 - रू. 1805
सोलापूर ते पुणे
अनारक्षित रू. 96 - रू. 110
2 एस आरक्षण : रू. 115 - रू. 129
ए सी : रू. 395 - रू. 437
सोलापूर ते दिल्ली
जनरल : रू. 335 - रू. 380
ए सी 3 : रू. 1550 - रू. 1770
एसी 2 : रू. 2255 - रू. 2555
एस सी 1 : रू. 3875 - रू. 4450
स्लिपर क्लास: रू. 595 - रू. 680