आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत परदेशी गुंतवणुकीला विरोध ; कर्मचार्‍यांचे धरणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वेत परदेशी गुंतवणुकीला विरोध म्हणून बुधवारी डीआरएम कार्यालयासमोर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. कामगार एकता जिंदाबाद, एनआरएमयू जिंदाबाद, रेल्वे प्रशासन मुर्दाबाद अशा घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून गेला.
केंद्र सरकारने नुकतेच रेल्वेमध्ये परदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिल्याने त्याचा थेट परिणाम कर्मचार्‍यांवर होणार आहे. रेल्वे हॉस्पिटल येथे कर्मचार्‍यांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. दिवसेंदिवस कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याने रिक्त पदे त्वरित भरावीत, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. एनआरएमयूचे विभागीय सचिव सुनील लोखंडे, पी. उमापती, डी.वाय. मस्के, राजू पुरुषोत्तम, फारुख शेख आदी पदधिकारी उपस्थित होते.