आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांना मिळणार तत्काळ ऑनलाइन तिकिटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतात लाखो रेल्वे प्रवासी रोज आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन) वेबसाइटवरून ऑनलाइन तिकीट बुक करीत असतात. त्यामुळे बऱ्याचदा ही वेबसाइट हँग तर होते किंवा तिकीट काढताना काही तांत्रिक अडचणीमुळे तिकीट बुक करणे मुश्किलीचे ठरते.

रेल्वे प्रवाशांना तिकीट बुक करताना कोणतेही अडचण जाणवू नये. म्हणून आयआरसीटीसीने तब्ब्ल 180 कोटी रुपये खर्च करून आयआरसीटीसी नेक्स्ट जनरेशन नावाची वेबसाईट सुरू केले आहे. या बेवसाइटची गती इतकी प्रचंड आहे की प्रत्येक मिनिटाला 7200 तिकीट बुक होऊ शकणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी या वेबसाइटचे लोकार्पण केले आहे. नव्या वेबसाइटमुळे प्रवाशांना तिकीट बुक करणे सोयीचे व सोपे होणार आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांच्या तुलनेने 50 टक्के प्रवासी आता ऑनलाइन पद्धतीने तिकीट काढून ई-तिकीटचा वापर करतात. 2005 मध्ये आयआरसीटीसी प्रवाशांच्या भेटीला आली आहे. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला. वेबसाइट लोकप्रिय झाल्यानंतर मात्र त्याचे युजर्स दविसेंदविस वाढू लागले. आणि वेबसाइटला गती कमी होत गेले. या संदर्भात प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरआरसीटीसी आपल्या तंत्रज्ञानात बदल करण्याचे ठरविले आणि त्यांनी त्या प्रकारे बदल केला. आयआरसीटीसीने तब्बल 180 कोटी रुपये खर्च आयआरसीटीसी नेक्स्ट जनरेशन वेबसाइट सुरू केली. यासाठी ते मागील दोन वर्षापासून परिश्रम घेत होते. कमर्शियल वेबसाइटमध्ये ही भारतातील सर्वात महागडी वेबसाइट असल्याचा दावा आयआरसीटीसी ने केला आहे. आज या बेबसाइटवरून रोज 4.51 लाख तिकिटे बुक केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा 17.46 टक्यांनी वाढ झाली आहे.

नव्या वेबसाइटचा फायदा
वेबसाइटची गती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सना तत्काळ तिकिटे मिळणार.पूर्वी मिनिटाला 4200 तिकीट बुक होत होती त्याची क्षमता वाढवल्याने 7200 तिकिटे प्रतिमिनिटाला बुक होतील. युजर्सची संख्या 1 लाख 20 हजार पोहचेल. वेबसाईटवरील अनावश्यक जाहिराती दूर करण्यात आल्याने प्रवाशांचे लक्ष भरकटणार नाही.
गरजेनुसार वेबसाइट
पूर्वी प्रवाशांना तिकीट काढताना काही अडचणी जाणवत होत्या. प्रवाशांना लवकरात लवकर तिकिटे मिळावीत म्हणून अत्यंत आधुनिक पद्धतीने ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार नव्या बेबसाइटची निर्मिती करण्यात आली.
प्रदीप कुंडु, सरव्यवस्थापक, आयआरसीटीसी नवी दिल्ली.
आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करताना अनेकदा ती लवकर ओपन होत नव्हती तर कधी आरक्षणाची प्रक्रिया चालू असताना तांत्रिक बिघाडामुळे तिकीट काढणे मुश्किल होत असायचे. नव्या वेबसाइटमुळे हे प्रश्न मिटतील.
पीयुषा जमखंडीकर, रेल्वे प्रवासी.