आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगला कार्यकाल संपुष्टात!, नियमाप्रमाणे काम करणार्‍या प्रामाणिक अधिकार्‍याची बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कायदा-नियमाप्रमाणे केलेल्या कामकाजामुळे मक्तेदार, राजकीय नेते यांचे हितसंबंध दुखावले. त्यांच्या नाराजीने अखेर आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली केली. गुडेवार नियुक्तीपासूनच असा प्रयत्न सुरू होता. सुरुवातीला त्यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर त्यांच्या बदलीचे कसोशीने प्रयत्न सुरू होते. सोमवारी जारी झालेल्या बदली आदेशाने त्यांचा महापालिकेतील अकरा महिन्यांचा चांगला कार्यकाल संपुष्टात आला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती असलेल्या बिपीन पटेल यांच्याशी संबंधित कंपनीने शहरातील 332 कोटींच्या रस्त्याच्या कामाचा मक्ता घेतला होता. गुडेवारांनी तो रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही बदली झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी त्यांनी असा धाडसी निर्णय घेत ड्रेनेजच्या कामाचा 312 कोटींचा मक्ता रद्द करून एस. एम. सी. (ठाणे) या मक्तेदाराला काळ्या यादीत टाकले होते.

उस्मानाबादेत उपमुख्य कार्यकारी असलेले गुडेवार 4 जुलै रोजी सोलापूर महापालिका आयुक्तपदी रुजू झाले. महापालिका प्रशासनातील नियमबाह्य कारभार त्यांनी संपवला. त्यात सत्ताधार्‍यांना धक्के देण्यास सुरुवात केली. आमदार दिलीप माने यांच्या सांगण्यानुसार होटगी आणि विजापूर रस्त्यावरचे अतिक्रमण काढल्याचे जाहीर सांगितल्याने माने यांची अडचण झाली. सभागृह नेते महेश कोठे यांच्या सुशील रसिक सभागृहाच्या बेकायदा बांधकामाच्या विषयास हात घातला. महापौर अलका राठोड यांच्या घराच्या विनापरवाना बांधकाम प्रकरणी चौकशी समिती नेमली. शहरातील अतिक्रमण, बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले. त्यात अनेक नगरसेवकांच्या मालमत्ताही होत्या.
11 महिने 20 दिवसांचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार

महसुली उत्पन्नात 100 कोटींनी वाढ
25 हजार कोटींचा विकास आराखडा
100 कोटींचा थीम पार्क आराखडा
शहरातील पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार
आठ स्मशानभूमी; पाच कोटींची केली तरतूद
जिल्हा वार्षिक योजनेतून 50 कोटी निधी
200 सिटी बसची योजना मंजूर
मिळकतीचे जीआयएस सर्व्हे
शहरात नो डिजिटल झोन
सभागृहाकडील 172 प्रलंबित विषय परत घेतले

मनपा कर्मचार्‍यांना ड्रेस कोड
187 कोटींचा टाकळी-सोरेगाव जलवाहिनी आराखडा या कारवाईने नेत्यांना दणका

सोहम प्लाझा : (मालक संजय शेळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्याशी संबंधित)

सुशील रसिक सभागृह : (सभागृह नेता महेश कोठे)

महापौरांचे घर :
(महापौर अलका राठोड)
हॉटेल सुलतान (नगरसेवक रफीक हत्तुरे, काँग्रेस)
हॉटेल शिवपार्वती (माजी महापौर मनोहर सपाटे, राष्टÑवादी काँग्रेस)
नगरसेवक अविनाश पाटील यांच्यावर फौजदारी (आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थन, भाजप)
सात रस्ता येथील हॉटेल बांधकामास नोटीस (इंडीचे माजी आमदार रवी पाटील)
2000 चौ. मी. जागा महापालिकेला देण्याची शासनाकडे विनंती. ती जागा अश्विनी रुग्णालयाचे चेअरमन बिपीन पटेल यांनी मागितली होती.
नगरसेवक नागेश ताकमोगे यांचे नगरसेवक पद रद्द (नंतर न्यायालयाकडून स्थगिती) (आमदार दिलीप माने यांचे समर्थक)
गाजलेल्या आणखी काही कारवाया
- शहरातील डिजिटल फलकावर कारवाई
- जुने एन मार्ट इमारतीस नोटीस (शकील मौलवी, बिल्डर)
- बेकायदा इमारती, सिंहगड इन्स्टिट्यूटला नोटीस (संजय नवले)
- मनपाचे नगर अभियंता सुभाष सावस्कर यांचे निलंबन
- विजापूर रस्त्यावरील 11 एकर जागा ताब्यात घेतली
शिंदे यांच्या पराभवानंतर झाली बदली
काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे खापर गुडेवारांवर फोडण्याची संधी असंतुष्टांनी साधली. एलबीटी वसुलीने व्यापारी तर बेकायदा बांधकाम पाडल्याने सामान्य लोक नाराज झाल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेच्या सफाईसाठी आणि विविध योजना केंद्रातून आणण्यासाठी शिंदे यांनीच गुडेवारांना आणल्याचे सांगितले जात होते. आता त्यांच्या बदलीमागे सत्ताधारी मंडळीच सामील असल्याची चर्चा आहे.