आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transgender Community News In Marathi, Divya Marathi, Lok Sabha Election

सुविधांसाठी तृतीयपंथीयांना ओळखपत्र मिळणे गरजेचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - समान अधिकारासाठी लढणार्‍या तृतीयपंथीयांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता देऊन दिलासा दिला. न्यायालयाच्या निर्णय होताच तृतीयपंथीयांनी जल्लोष केला. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र असणे अत्यावश्यक आहे. ते देण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी सोलापुरातील तृतीयपंथीयांकडून करण्यात आली.
सरकारी नोंदीत केवळ स्त्री आणि पुरुष हे दोन वर्ग मान्यताप्राप्त होते. आता सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तृतीयपंथीयांना लिंग वर्गात कायदेशीर स्थान मिळणार आहे. तसेच त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून मतदान ओळखपत्र, पारपत्र, वाहन परवाना आदींसह सर्व सुविधा मिळणार आहेत. इतर मागासवर्गीयांना देण्यात येणार्‍या सर्व सुविधांही त्यांना मिळणार आहेत. परंतु प्रथम ओळखपत्र मिळणे अत्यावश्यक आहे.


निरामय आरोग्य धाम, दोस्ताना कार्यरत
सोलापूर शहरातील तृतीयपंथीयांच्या सहकार्यासाठी काम करणार्‍या निरामय आरोग्य धाम आणि दोस्ताना संघ अशा दोन संस्था आहेत, तर तालुक्यात क्रांती नावाची एक संस्था आहे. तृतीयपंथीयांना समाजात मिळणारी सापत्न वागणूक थांबविण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्याचे काम या संस्था करीत आहेत. सोलापूर शहरात निरामय आरोग्य धाममध्ये 174 तर दोस्ताना संघ मध्ये 137 तृतीयपंथीयांची नोंद आहे. अशी माहिती, दोस्ताना संघटनचे सदाशिव शिंदे यांनी दिली.


निर्णयाचे समाधान; नोकरीचीही अपेक्षा
आमचं नशीबंच खोटं. आजपर्यंत आम्हाला घरात, समाजात सन्मानाची वागणूक मिळाली नाही. परंतु न्यायालयाने खूपच समाधानकार क निर्णय आमच्या बाजूने दिला. पिंकी बंडगर, तृतीयपंथीय


आई-वडिलांनीच नाकारलं त्याला समाज कसा स्वीकारेल. पण न्यायालयाने आयुष्याचे कल्याण करण्याचा निर्णय दिला. सरकारने याची अंमलबजावणी लवकर करावी. सुनीता बेत, तृतीयपंथीय


शासकीय, निमशासकीय मध्ये आम्हाला नोकरीची संधी मिळावी. तेथे आमची सुरक्षाही व्हावी, याचाही सरकारने विचार करावा. नाही तर संधी देऊनही अर्थ राहणार नाही. मालिनी बगले, तृतीयपंथीय