आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशामध्ये बहुभाषिक तज्ज्ञांचा आहे तुटवडा; प्रा. भावे यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अनुवादाद्वारे दोन भाषा, संस्कृती, विचार आणि एकमेकांची मने जुळतात. सामाजिक एकात्मता रुजण्यास मदत होते. आपल्या देशात भरपूर भाषा आहेत. पण, एकापेक्षा जास्त भाषांची चांगली जाण असणार्‍यांचा तुटवडा असल्याने बहुभाषिक तज्ज्ञ लेखक-अनुवादकांचे कार्य फारच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आंतरभारती केंद्राच्या अध्यक्षा प्रा. पुष्पा भावे यांनी केले.
शरद प्रतिष्ठानतर्फे शिवस्मारक सभागृहात आयोजिलेल्या पुरस्कारांचे वितरण 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ अनुवादक-लेखक प्रा. डॉ. निशिकांत ठकार, डॉ. अजिज नदाफ, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, स्वरुपा बिराजदार यांना शरद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुरस्काराला उत्तर
डॉ. ठकार म्हणाले, ‘अनुवादक दुय्यम दर्जाची साहित्यकृती निर्माण करतात, असे काहीजणांना वाटते. पण, आपल्या कार्यकर्तृत्वावर असलेल्या विश्वासामुळे मला दुय्यम दर्जाचे काम वाटत नाही. दुसर्‍या भाषेतील शब्दाचा मूळ अर्थ न बदलता त्या ठिकाणी आपल्या भाषेतील योग्य शब्द बसवण्याचे कौशल्य अनुवादक करू शकतो, असे त्यांनी सांगितले. डॉ. ठकार यांनी या वेळी पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख करून मिश्किल टिपण्णी केली तेव्हा सभागृहात हशा अन् टाळ्यांचा कडकडाट झाला. याप्रसंगी डॉ. नदाफ, डॉ. बोल्ली, बिराजदार यांची भाषणे झाली.