आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Treatment On Imprecise Disease By Nano Technology

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॅनो टेक्नॉलॉजीने दुर्धर रोगावर इलाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग औषध क्षेत्रात प्रभावीपणे होत आहे. त्याचा उपयोग कॅन्सरसारखा दुर्धर आजार निवारण्यासाठी उत्तमप्रकारे होतो. वैद्यकीय क्षेत्रातील आमूलाग्र बदल म्हणजे सोन्यापासून तयार केलेल्या गोल्ड नॅनो पार्टिक्सच्या उपयोगाने होणार आहे.
आजपर्यंत मेंदूमध्ये आैषध पोचविण्यासाठी प्रभावी साधन नव्हते, ते याद्वारे शक्य होईल, असे प्रतिपादन नॅनो टेक्नॉलॉजी संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. माधुरी शरण यांनी शुक्रवारी येथे केले.
वालचंद महाविद्यालयात वालचंद सेंटर फॉर रिसर्चच्या वतीने "नॅनो टेक्नॉलॉजी अँड बायो नॅनो टेक्नॉलॉजी' या विषयावर पाच दिवसांची कार्यशाळा शुक्रवारी सुरू झाली. या वेळी डॉ. शरण यांचे बीजभाषण झाले, तीत त्या बोलत होत्या. या वेळी डॉ. राकेश आफरे, नलीन शर्मा, राजू गुरूंग, डॉ. माहेश्वर शरण, प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे, बायोटेक्नॉलॉजीचे समन्वयक डाॅ. के. आर. राव उपस्थित होते.
डॉ. शरण म्हणाल्या, ‘नॅनो टेक्नॉलॉजी वटवृक्ष आहे, ज्याची उत्पत्ती ही रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स अशा मूळ शास्त्र शाखांपासून झाली. त्याची व्याप्ती ही बायो नॅनो टेक्नॉलॉजी, कार्बन नॅनोटेक्नॉलॉजी, मटेरिअर सायन्स आदी विविध शाखांमध्ये आहे. नॅनोचा मराठी अर्थ म्हणजे अतिसूक्ष्म. अतिसूक्ष्म म्हणजे एक मीटरचा दहा लाखावा भाग असणारा कण. याची निर्मिती नॅनो टेक्नॉलॉजीच्या ज्ञानाद्वारे केली जाते.
दुपारच्या सत्रात कार्यशाळेत कार्बन नॅनो मटेरिअल्स आणि कार्बन डॉट््स यासारखे डोळ्यांना दिसणाऱ्या अतिसूक्ष्म घटकांचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रणालीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यांची निरीक्षण पद्धती शिकवण्यात आली.
कार्बन पोलादापेक्षा २०० पट मजबूत
डॉ.माहेश्वर शरण यांनी "कार्बन आणि कार्बन नॅनो टेक्नॉलॉजीची ओळख' या विषयावर व्याख्यान दिले. याच्या विविध क्षेत्रातील उपयोगाबाबत त्यांनी सांगितले. कार्बनचे नॅनो पार्टिकल नॅनो ट्यूबचे वजन सर्वात कमी असून त्याची मजबुती ही पोलादापेक्षा दोनशेपटीने अधिक आहे. त्यामुळे चिलखती जॅकेट बनविण्यासाठी याचा उपयोग होतो. कार्बन नॅनो पार्टिकल्स हे हवेतील आणि पाण्यातील विषारी घटकांना वेगळे करून हवा आणि पाणी शुद्ध करता येते.