आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ला भ्रमंती : पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेस पर्यावरणाची जोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गडकोट, किल्ले यांची भ्रमंती करत शिवरायांची प्रेरणा जागवण्यासाठी हिंदवी परिवार सातत्याने अनेक साहस व गिर्यारोहण मोहिमा काढते. यंदाच्या पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान दोन लाख विविध प्रजातीच्या बियांचे रोपण या 60 किलोमीटर मोहीम मार्गावर करण्यात येत आहे.

12 ते 14 जुलै 2014 दरम्यान देशव्यापी पन्हाळगड ते पावनखिंड अशी मोहीम होणार आहे. यात कोल्हापूरच्या हायकर्स ग्रुपचे सभासदही सामील होणार आहेत. अमरावतीचे आमदार बच्चू कडू, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, संभाजीनगरचे अंबादास दानवे, मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, डीसीपी सोमनाथ घार्गे हेदेखील मोहिमेत सामील होणार आहेत.

पाच वर्षांपासून आयोजन
शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 15 वर्षांपासून सबंध महाराष्ट्रात तर सोलापुरातही मागील पाच वर्षांपासून मोफत विविध गड आणि किल्ले यांच्या मोहिमांचे आयोजन करण्यात येते. छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या भक्तांना कायमस्वरूपी एका छत्राखाली आणावे हा या मोहिमांमागचा उद्देश आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गडकोटांना, युद्धभूमीवर शिवभक्तांना प्रत्यक्ष नेऊन भूगोलासह इतिहासाची माहिती देण्यासाठी ही मोहीम असते.

येथे साधा संपर्क
ही मोहीम पूर्णत: मोफत असून केवळ प्रवासखर्च सहभागींना करायचा असतो. या मोहिमेत सामील होण्यासाठंी 5 जुलै ही अंतिम तारीख आहे, तर अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी 9011014399, 9422067341 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रोपण आणि पोषणही
- या मोहिमेत सर करण्यात येणारे अंतर किमान 60 किलोमीटर आहे. पूर्णत: डोंगराळ आणि आदिवासी भाग आहे. अशा परिस्थितीत तग धरून वाढू शकणाºया आणि गर्द सावली देणाºया तसेच दुर्मिळ होत चाललेल्या वृक्ष प्रजातीच्या बियांचे रोपण या परिसरात करणार आहोत. शिवाय केवळ रोपण करून सोडणार नाही तर मागील 15 वर्षांपासून वर्षातून दोनदा येथे मोहिमा होत असल्याने संपूर्ण परिसरात चांगला परिचय आहे. तेथील नागरिकांकरवी वृक्षांच्या पालनपोषणाचे काम करण्यात येणार आहे.’’ डॉ. शिवरत्न शेटे