आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेचे सेव्हन सुमीट स्वप्न दृष्टिपथात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सातही खंडातील सात सर्वोच्च पर्वत (सेवन्स सुमीट) पादाक्रांत करण्याचे स्वप्न बाळगत येत्या 10 जुलैला मास्कोच्या एल्बु्रस या दुसर्‍या सर्वोच्च पर्वतावर सोलापूरचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे चढाई करणार आहे.‘वर्ल्ड पीस सेव्हन समीट मोहीम’ असे मोहिमेचे नाव आहे.

माऊंट एल्ब्रुस चढाईसाठी निवडला आहे. याची उंची 18 हजार 710 फूट इतकी आहे. काळा समुद्र व कॅस्पियन समुद्रादरम्यान हे शिखर आहे. जॉर्जिया देशाच्या सीमेपासून 20 किलोमीटरवर असून ते निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. येथे उणे 25 डिग्रीपर्यंतचे तापमान असते. भणाण हिमवादळ घोंगावत असल्याने हा पर्वत चढाईसाठी कठीण आहे. आनंदसमवेत हरियानातील एव्हरेस्टवीर रामलाल शर्मा, दिल्लीतील प्रतीक गुप्ता, उत्तरप्रदेशातील रवीकुमार हेही सहभागी असतील. आनंद या टीमचे नेतृत्व करेल. महिला गिर्यारोहिका अनुरिमा सिन्हा ही सुद्धा या मोहिमेत सहभागी होण्याच्या तयारीत आहे. सात टप्प्यातील ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर तो सातही खंडातील सर्वोच्च शिखरावर पाय ठेवणारा तो पहिला भारतीय ठरेल. आनंद या सर्व शिखरांवर भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजवणार आहे. सोलापूरच्या मुलींनी स्वाक्षरी केलेला खास ध्वजही तो एल्बु्रस पर्वतावर फडकविणार आहे. मुलींच्या शिक्षणप्रसाराला बळकटी देण्यासाठी आनंदने हा उपक्रम हाती घेतला आहे.
आशीर्वाद तेवढे देतो...
आनंदची स्वप्ने आता विस्तारली आहेत, जगातील सात खंडांना ती गवसणी घालताहेत. आम्ही आनंदच्या पाठीशी फक्त आशीर्वादाचा हातच ठेवू शकतो. तेच आमचे पाठबळ आहे. बाकी आनंद जे करतोय ते स्वत:च्या हिमतीवर. त्याचे स्वप्न साकारणे हेच आमचेही स्वप्न झालेय, असे आई पार्वती, वडील अशोक बनसोडे यांनी सांगितले.
सर्वांच्या सहकार्यातून ऊर्जा
४गेल्या दोन वर्षात आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक अशा अनेक संकटांना तोंड देत मी माझे सात खंडीय स्वप्न जीवंत ठेवले आहे. एव्हरेस्ट मोहिमेसाठीच्या कर्जाचा काही भाग शिल्लक आहे. पण नवी आंतरराष्ट्रीय मोहीम मला खुणावते आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यातूनच या मोहिमेसाठीची ऊर्जा मिळतेय.
- आनंद बनसोडे, एव्हरेस्टवीर

जगातील सात सर्वोच्च शिखरे
एव्हरेस्ट : 29 हजार 029 नेपाळ
एल्व्रुस : 18 हजार 510 रशिया
बियांक : 15 हजार 781 युरोप
किलीमॅन्जरो : 19 हजार 341 : आफ्रिका
एकुंगागुवा : 22 हजार 837 अर्जेंटिना
मॅन्किले : 20 हजार 237 उत्तर अमेरिका
पुंकाक जय : 16 हजार 024 इंडोनेशिया