आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 ऑगस्ट 1947 रोजी सोलापूर शहरात फडकला होता तिरंगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर शहरात पहिल्या स्वातंत्र्यदिनी झालेले कार्यक्रम, उत्साहाने झालेले स्वागत याचे वृत्त दैनिक सोलापूर समाचारने दिले. त्यातून 14, 15 आणि 17 ऑगस्ट 1947 अशा तीन दिवसांच्या सुवर्णक्षणांच्या आठवणींना उजाळा..


स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी रोषणाई शहरात घंटानाद, हर्षोल्हास, आनंद
‘सोलापूर समाचार’च्या विशेषांकात
सोलापूर समाचारचा 12 पानांचा विशेषांक काढण्यात आला. दोन आणे किंमत.
शहरातील वातावरण, स्वातंत्र्य दिन साजरा होणारा ठिकाणांची माहिती होती.
जिल्हा मोटार संघाने एक हजार एकची देणगी दिली होती, त्यातून प्रभातफेरीसाठी निघणार्‍या वाहनांची रोषणाई करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी घाटगे व डीएसपी मुगवे यांच्या हस्ते पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजवंदन झाले.
दुपारी होम मैदानवरून मोटार, टांगे, सायकली, बैलगाड्या, उंट यावरून प्रचंड गर्दीत मिरवणूक निघाली. महिला तरुण अबालवृध्द यांनी आपल्यापरीने अखंड जयघोष केला होता.
रात्री 12 पासून निरनिराळय़ा बाजारपेठा, गिरण्या, सार्वजनिक संस्था, कलेक्टर कचेरी, मामलेदार क चेरी तर काही मोठे वाडे, घरांवर रोषणाई करण्यात आली होती. शहरभर विविध ठिकाणांहून प्रभातफेरी काढण्यात आली. मेवा, मिठाई, भोजन यांची तृप्त होईपर्यंत मेजवानी देण्यात आली. सजेलेले टांगे, सायकली, उंट, मोटारी, कवायतीसाठी जमलेले विद्यार्थी, प्रभातफेरीसाठी नटून आलेल्या महिला अन् जल्लोषी तरुण यांच्या साक्षीने साजरा होणारा तो पहिला स्वातंत्र्य दिन. वातावरण हर्षोल्लासाने भरलेले होते. आनंदोत्सव डोळय़ात साठवण्याजोगा होता.

अजस्त्र घंटानाद
जुनी गिरणीमध्ये अभूतपूर्व रोषणाई करून प्रवेशद्वाराजवळ अजस्त्र घंटानाद रात्रभर करण्यात आला. त्यात नागरिकांनी जागरण करून उत्साह साजरा केला.

सराफांनीही केला उत्सव
सराफ असोसिएशनच्या वतीने जल्लोषाने स्वातंत्र्य दिनाचे स्वागत केले होते. विनायकराव औरंगाबादकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कुंभारीत वासुदेव विठ्ठल आरोळे यांनी आपल्या गिरणीत महिलांना मोफत धान्य दळून दिले होते.

17 पर्यंत दारू दुकाने बंद
जिल्हाधिकार्‍यांनी 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत दारूची दुकाने बंद ठेवली.