आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाईंच्या अपु-या स्वप्नांसाठी प्रयत्न करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण देण्यासाठी शिक्षिका म्हणून कार्य केले. सामाजिक स्थिती विचित्र असतानाही त्यांनी महिलांना न्याय मिळवून दिला. समाजव्यवस्थेच्या सुधारणेतील त्यांची अपुरी स्वप्ने साकार करण्यासाठी महिलांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी चळवळ उभी करावी, असे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. क्रांतिज्योती सावित्री, रमाई मागासवर्गीय महिला प्रतिष्ठानने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमदार शिंदे यांच्या हस्ते महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.


या वेळी सुभद्रा उटगी, तारामती रणश्रृंगारे, भीमाबाई सिद्धगणेश, शारदा गायकवाड या आंबेडकर चळवळीतील महिलांचा सत्कार करण्यात आला. ज्योती वाघमारे यांनी सावित्रीबार्इंचे महिलांसाठी योगदान व आजची स्त्री, सुशिला आबुटे यांनी माता रमाईचा त्याग या विषयावर व्याख्यान दिले. शिक्षण सभापती व्यंकटेश कटके, पांडुरंग चौधरी, नगरसेविका रोहिणी तडवळकर, अध्यक्षा विशाखा काळे, अशोक जानराव आदींची उपस्थिती होती.
भारतात सर्वप्रथम महिलांमध्ये शिक्षणाची चळवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनीच केली. त्यामुळेच आज सर्व क्षेत्रात स्त्री आघाडीवर आहे. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपराविरुद्ध संघर्ष केल्यामुळेच सामाजिक परिवर्तन झाले आहे, असे मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी समाज प्रबोधनाचा वसा घेतला होता. त्यांच्या त्या निणर्याला आज मानाचे स्थान मिळत आहे, अशी भावना आयुक्त गुडेवार यांनी व्यक्त केली.

ड्रीम’तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
ड्रीम फाउंडेशनच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गजराबाई भतगुणकी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुजाता बिज्जरगी, रबिया मिर्झा, वैशाली बहिर, विजयालक्ष्मी मठपती, रेणुका राठो, कल्पना पाटील, स्वप्नली देवघर, चंद्रशेखर माळी यांची प्रमुख उपस्थिती होते. प्रास्ताविक संगीता भतगुणकी यांनी केले तर सूत्रसंचालन मच्छिंद्र बिज्जरगी आणि आभार काशिनाथ भतगुणकी यांनी मानले.

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी, पंरपरांविरुद्ध संघर्ष केल्यामुळे सामाजिक परिवर्तन झाले, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहर अध्यक्षा न. भा. काकडे यांनी केले. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रम त्या बोलत होत्या. सावित्रीबार्इंमुळे महिला स्वत:च्या विकासासाठी घराबाहेर पडू शकल्या. व्यासपीठावर सुमन केंद्रे, मनीषा टांक, संचालक प्रशांत नलावडे, उपप्राचार्य उत्तमराव हुंडेकर, रावसाहेब ढवण उपस्थित होते.