आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चौदावर्षीय शाळकरी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला. ही घटना गुरुवारी (दि.११) सकाळी साडेअकराच्या सुमाराला घडली. लता लिंगय्या येमूल (रा. १९६४, एच ग्रुप, जुनी विडी घरकुल) यांनी जेल रोड पोलिसात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शनविारी ही माहिती दिली.
लता यांची मुलगी कीर्तना (वय १४) तिचा भाऊ कार्तिक असे रिक्षातून साखरपेठेतील विद्यानिकेतन शाळेत जात होते. भावाला शाळेत सोडून ती मुलगी वही घेण्यासाठी दुकानात गेली. दरम्यान, पांढऱ्या कारमधून दोन महिला तोंडाला रूमाल बांधून आल्या. तुझी आजी शारदाने आम्हाला पैसे देऊन तुला आणण्यास सांगितले आहे, असे म्हणत जबरदस्तीने गाडीत बसविले. नंतर पोलिस मुख्यालय मैदानासमोरून जाताना मुलगी दोघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार साखरपेठेतील आशिकल मैदानाजवळील पाणी टाकीजवळून ते पोलिस मुख्यालय मैदानापर्यंत घडला. याबाबत फौजदार संतोष गायकवाड यांना विचारले असता, मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे. दोन दविसांपासून याचा तपास चौकशी सुरू आहे. नेमकी घटना फिर्याद याचा ताळमेळ बसला नाही. चौकशी सुरू असून लवकरच घटनेचा उलगडा होईल, असे म्हणाले.
घटनेबाबत काही प्रश्न!
कारमधूनजाताना मुलीकडे चटणी आली कोठून?
धावत्या कारमधून ती उतरली कशी?
आजीने पैसे देऊन तुला आणण्यास सांगितल्याचे दोघे संशयित म्हणत होते म्हणजे ओळखीच्या व्यक्तीने हा प्रकार केला असावा.
या घटनेचा उलगडा पोलिसांकडून व्हावा.