आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायी जाणार्‍या भाविकांसाठी रस्ता हवा मोकळा, निर्धोक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातून लाखो भाविक तुळजापुरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त पायी जातात. सोलापूर ते तामलवाडी या मार्गावर सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच एकत्रित गर्दी होणार याची काळजी घ्यावी.

जुना तुळजापूर नाका येथून दुचाकी व तीनचाकी वाहनांना पोलिस बंदी घालतात. पण काही वाहनचालक दुचाकी नेण्याचा प्रयत्न करतात यावर आळा घालावा.

नवरात्र उत्सवाच्या अगोदर तुळजापुरात आणि मध्य प्रदेशात काल रविवारी चेंगराचेंगरी झाली. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर मंदिर, सोलापूर-तुळजापूर मार्गावर एकत्रित गर्दी होणार नाही. कुठलेही वाहने रस्त्यात घुसणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. पायी जाणार्‍र्‍या भाविकांना काही स्वयंसेवी मंडळाकडून प्रसाद वाटप केला जातो त्याठिकाणी एकदम गर्दी होणार नाही, रांगेत प्रसाद वाटप होईल याबाबत काळजी घ्यावी.

गुरुवारी पूर्णपणे वाहतूक बंद राहील
तुळजापूर मार्गावर वाहतूक गुरुवारी पूर्णपणे बंद राहील. अवजड वाहनांना 19 तारखेपर्यंत बंदी आहेच. इटकळमार्गे सोलापूर- तुळजापूर या मार्गावरून वाहने ये-जा करतील. रूपाभवानी चौकापासून वाहनांना बंदी आहे. मोठय़ा प्रमाणात वाहतूक पोलिस नेमले आहेत. काही अत्यावश्यक वाहनांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. तीच वाहने ये-जा करतील. पोलिसांना सहकार्य करावे.’’ यशवंत शिर्के, वाहतूक पोलिस निरीक्षक

ध्वनिक्षेपकावरून माहिती देणार
तुळजापूर नाका ते तामलवाडीपर्यंत ग्रामीण पोलिस हद्द आहे. दरवर्षी गस्त, अडथळे लावले जाते. यंदा भाविकांसाठी सूचना फलक, ध्वनिक्षेपकावरून माहिती देण्यात येईल. वाढीव गस्त आदीसाठी नियोजन आहे. समोरील दिशेने कुणी भाविक अथवा दुचाकीस्वार येणार नाही याची काळजी घेतली जाईल. पोलिसांची जादा कुमक नेमण्यासाठी अधिकार्‍यांशी मंगळवारी चर्चा आहे.’’ तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक

साध्या वेशातील पोलिस
जुना तुळजापूर नाका ते नवीन नाका या मार्गावर जोडभावी पोलिसांचे गस्तचे नियोजन आहे. पाकीटमार, दागिने चोर, मोबाइल चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेषातील महिला व पुरुष पोलिस कर्मचारी नेमलेले आहेत. बंदोबस्तात एक फौजदार व दहा कर्मचारी यांचे गस्ती पथक आहे. रूपा भवानी मंदिरात बंदोबस्त चोख राहील.’’ काळूराम धांडेकर, जोडभावी पोलिस निरीक्षक

छायाचित्र- तुषार दोशी