आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twins Child Samelan At Solapur On 29 December By Lions Club

सोलापुरात जुळ्यांचे आगळे संमेलन; लायन्सचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनच्या वतीने जुळय़ांचे आगळे -वेगळे संमेलन आयोजिले आहे. 29 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मेसॉनिक हॉल (रंगभवन जवळ) येथे संमेलन होणार असल्याची माहिती अध्यक्ष र्शीनिवास पुजारी यांनी दिली.
समाजात सर्वांना जुळय़ा-तिळय़ा व्यक्तीबद्दल कुतूहल असतेच. प्रत्येकाला दोन-चार जुळय़ा व्यक्तीबद्दल माहिती असते. जिल्ह्यातील सर्व जुळय़ा-तिळय़ांची माहिती कुणाला नसते. हे जाणून घेण्यासाठी प्रांत 323 डी सोलापूरचे प्रांतपाल डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन आयेाजिले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व जुळय़ा व तिळय़ा व्यक्तींनी चंद्रकांत आलमेलकर, संध्या र्शृंगारपुरे, र्शीनिवास पुजारी, संजय कोरे (9422457781) यांच्याशी संपर्क साधावा.