आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - जुळ्या मुलांची संघटना (सोलापूर ट्वीन असोसिएशन) स्थापन करण्याची घोषणा लायन्स क्लब संघटनांच्या रविवारी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. एक ते 18 वर्षातील 62 जुळ्यांची पालकांसह उपस्थिती होती. रंगभवन चौकातील मेसॉनिक हॉल येथे रविवारी सकाळी बालरोगतज्ज्ञ डॉ. पी. टी. कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रांतपाल डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, चारही लायन्स संघटनांचे अध्यक्ष संजय कोरे, चंद्रकांत आलमेलकर, श्रीनिवास पुजारी, नागेश बुगडे आदी उपस्थित होते.
पालकांनी कथन केले अनुभव
जुळ्यांच्या वागण्या-बोलण्याबरोबरच त्यांच्या सहवासातील आठवणीं सांगत काही पालकांनी आपले घरातील, शाळेतील अनुभव कथन केले. काही गमती-जमतीही सांगितल्या गेल्या. सुरुवातीला अनेकांना अवघडल्यासारखे वाटत होते, पण नंतर हळू-हळू सारेजण या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. दिवसभर हा सोहळा चालला. मोहोळ, मंगळवेढा, बाश्री व शहरातील जुळ्यांचा या कार्यक्रमात सहभाग होता. असा कार्यक्रम होऊ शकतो, याची कल्पनाही नव्हती. पण, लायन्सने हा चांगला उपक्रम घेतला आहे. संघटना स्थापण्याचाही निर्णय चांगला आहे, अशी प्रतिक्रिया दोन जुळ्या मुलींचे पालक राजीव कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
डॉक्टरांचे झाले मार्गदर्शन
जुळ्यांच्या संदर्भातील शारीरिक व मानसिक तेबाबतची माहिती देत डॉ. एन. के. चंडक , डॉ. पी. टी. कुलकर्णी, डॉ. उमरदंड यांनी जुळ्याचे पालन-पोषण आदी विषयी माहिती दिली. लायन्सतर्फे या जुळ्यांची वर्षभर आरोग्य चाचणी घेणे, त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करणे, त्यांच्यातील कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न आदी मोहीम राबविणार आहे.
संघटना स्थापण्याचा निर्णय
या कार्यक्रमात जुळ्यांची संघटना स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली, त्याला सर्व पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ही संघटना त्या पालकांनीच स्वतंत्रपणे चालवायची आहे. लायन्स संघटना त्यांना मदत करतील. संघटनेचे स्वरूप, रचना पालकांनीच ठरवावी, असे ठरले. लवकरच याबाबतचा निर्णय होईल.’’ नरेंद्र गंभीरे, जिल्हा प्रांतपाल, लायन्स क्लब
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.