आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर शहरात एकाचा शोध घेताना सापडले दोन मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विडी घरकुल परिसरातील म्हाडा कॉलनी जवळील विहिरीत दोघा तरुणांचे मृतदेह सापडले. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमाराला एक तरुण विहिरीत पडल्याची माहिती अग्निशामक दलाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर शोधमोहीम घेताना सुरुवातीला एका तरुणाचा तर अध्र्या तासाने दुसरा मृतदेह हाती लागला. एकाचा शोध घेताना दुसरा मृतदेह सापडला.


प्रभाकर जयराम बाबरे (वय 40, रा. विडी घरकुल बी-40), शेखर अंबादास कस्तुरे (वय 35, रा. लक्ष्मी चौक, विडी घरकुल) या दोघांचा मृत्यू झाला आहे. बाबरे हे गुरुवारी सायंकाळपासून घरातून निघून गेले होते. नातेवाइकांनी रात्री चौकशी करून माहिती घेतली. पण, ते सापडले नव्हते. आज दुपारी कस्तुरे हे विहिरीत पडल्याचे नागरिकांनी पाहिल्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाला माहिती दिली. त्यानंतर अधीक्षक केदार आवटे, जवान उमराणी, इराण्णा जाबा, प्रल्हाद काटकर, बिराजदार, मंठाळकर, मोरे या पथकाने गळ टाकून शोधकार्य सुरू केल्यानंतर पंधरा मिनिटांत मृतदेह सापडला. पण, तो वेगळाच होता. जमलेल्या गर्दीत एकाने त्याला ओळखले आणि त्याचे बाबरे नाव असल्याचे निष्पन्न झाले. पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यानंतर कस्तुरे यांचा मृतदेह हाती लागला. नेमके दोघेजण विहिरीत कसे पडले, कारण काय याचा शोध घेण्यात येत आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे साहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी दिली.