आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र अपघातात दोन ठार; 3 जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रक, टेम्पोवर आयशर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी दोनच्या सुमाराला देगाव नाक्याजवळील देशमुख-पाटील वस्तीजवळ घडला. बळीराम कबाडे (वय 23, रा. लऊळ, माढा), नामदेव मिरेकर (वय 30, र. देऊळगावराजा, बुलढाणा) या दोघांचा मृत्यू झाला. अनिल चौगुले (वय 24), विजय पवार (वय 35), मंगेश (वय 28, पूर्णनाव नाही, रा. सर्वजण वाघोली, पुणे) हे जखमी झाले आहेत. ट्रक (एमएच 45- 0406), आयशर टेम्पो (केए 28-4337), टेम्पो (एमएच 12 एचडी 4398) या वाहनांचा विचित्र अपघात झाला. ट्रक आणि टेम्पो दोन्ही वाहने दुरुस्तीसाठी थांबले होते. जखमी विजय पवार यांच्या नातेवाईकाचे लग्न रविवारी अशोक चौकात होते. त्यासाठी पवार, अनिल, नामदेव, मंगेश चौघे मित्र सोलापुरात आले होते. चौघेजण पुण्यात वाहनावर चालक म्हणून काम करतात. त्यांच्या मित्राचा टेम्पो हैदराबादला साहित्य उतरविण्यासाठी गेला होता. सोलापुरात तो योगायोगाने आजच आला होता. लग्न आटोपून सर्वजण आयशर टेम्पोतून पुण्याकडे जात होते. देशमुख पाटील वस्तीजवळ आल्यानंतर थांबलेल्या ट्रकवर ती आदळली. ट्रक पुढील टेम्पोवर आदळली. त्याचवेळी बळीराम हा खाली उतरून ट्रकची पाहणी करीत होता. धडक बसल्याने तो जागीच मरण पावला. नामदेव याचा सायंकाळी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.