आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - एका वाहिनीचे पत्रकार आहोत, असे सांगून नागरिकांकडून पैसे उकळणार्या दोघा तोतया पत्रकारांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायदंडाधिकारी ए. ए. शिंदे यांनी शुक्रवार सुनावली. राहुल बाबासाहेब व्हटकर (वय 32, रा. पंचायत समितीजवळ, मंगळवेढा), नानासाहेब रंगनाथ सूर्यवंशी (वय 44, रा. मरवडे, मंगळवेढा) अशी त्यांची नावे आहेत.
अमेय पोळेकर यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना 18 जानेवारी 2006 रोजी घडली होती. व्हटकर हा तोतया पत्रकार म्हणून तर सूर्यवंशी हा कॅमेरामन म्हणून काम करत होता. बनावट कागदपत्रे तयार करून व वृत्तवाहिनीचा बनावट लोगो, ओळखपत्र तयार करून अधिकृत पत्रकार असल्याचे सांग़ून नागरिकांकडून पैसे उकळत असत. ही बाब कळल्यानंतर सोलापूरचे स्थानिक प्रतिनिधी पोळेकर यांनी शहर गुन्हे शाखेत तक्रार दिली होती. त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी दोघांना बसस्थानकाजवळ सापळा रचून अटक केली. पोलिस तपासात ही बाब उघडकीस आली. पोळेकर, सहाय्यक आयुक्त प्रभाकर मोरे, पद्दा दवे, राजेंद्र साठे यांच्यासह सात जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. बनावट कागदपत्रे व बोधचिन्ह तयार करून लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
सरकारतर्फे सार्थक चिवरी, फिर्यादीतर्फे जयदीप माने, प्रशांत यादव, आरोपीतर्फे राजेंद्र बायस, श्री. खरात, एम. बी. सोलनकर या वकिलांनी काम पाहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.