आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Two Friends Died In Accident As Car Falls In Canal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅनॉलमध्ये कार पडून दोघांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- सातारा येथील पार्टीसाठी गेलेल्या चौघा मित्रांपैकी दोघांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. इंडिका कार थेट कॅनॉल मध्ये गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सदरबाजार परिसरात शोककळा पसरली .
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहीती पुढील प्रमाणे: कनिष्क संजय जगताप( 18),मयूर सूनिक अवघडे (23),सुशांत सुधिर साळकर (22 ) पराग धनंजय शिंदे (19) हे सुट्टी संपणार म्हणून एकत्रित जेवण्यासाठी मेढा येथे गेले होते. रात्री जेवण करुन येत असताना साबळेवाडी येथे खणलेल्या कॉनॉलच्या सर्विस रोडने जात असताना निसरड्या रस्त्यावरु इंडिका कार थेट उरमोडी-कण्हेर कॅनॉल मध्ये गेली. चौघांपैकी सुशांत सुधीर साळेकर आणि पराग धनंजय शिंदे या दोघांनी कारमधून उड्या टाकून जीव वाचवला. साबळेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दारे उघडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.