आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन घरफोड्या; चार लाखांचा ऐवज लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तुळजापूर रोड आणि उत्तर कसबा या दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या. दोन्ही मिळून 4 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश शिंगडगावकर (सिद्धिविनायक नगर, तुळजापूर रोड) हे लग्नानिमित्त 4 ते 6 जून या कालावधीत बाहेरगावी होते. या काळात त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील 50 हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही, 25 हजार रुपये किमतीचा लॅपटॅप, 22 ग्रॅम सोन्याची बोरमाळ, 50 ग्रॅम सोन्याचे गंठण, 35 ग्रॅम सोन्याचे लॉकेट, 20 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे पंैजण, सोन्याची नथ आदी तीन लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.


गणेश शिंदे (राधाकृष्ण अपार्टमेंट, ब्लॉक नंबर 7, उत्तर कसबा) हे 4 ते 6 जून दरम्यान ते लग्नानिमित्त बाहेरगावी होते. या दरम्यान अज्ञात चोरट्याने एकूण 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. फौजदार चावडी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.


गुंडाळून ठेवलेले तीन लाख वाचले
गणेश शिंदे आणि त्यांची पत्नी हे दोघेही शिक्षक आहेत. फ्लॅट खरेदी करण्यासाठी त्यांनी कपाटात सुमारे तीन लाख रुपये रोख ठेवले होते. अज्ञात चोरट्याने कपाटातील इतर साहित्य आणि रोख रक्कम चोरली, मात्र गुंडाळून ठेवलेल्या त्या तीन लाख रुपयांकडे त्यांचे लक्ष गेले नाही. त्यामुळे त्यांची मोठी रक्कम सहीसलामत राहिली.