आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...नाही तर मालट्रक पेटला असता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बोरामणीजवळील कीर्ती गोल्ड कंपनीतून कोंबडी खाद्य घेऊन ट्रक (केए २५ सी ७२८) हाॅस्पेटच्या दिशेने जात होता. महावीर चौकात आल्यानंतर केबीनजवळ धूर येत असल्याचे दोन पोलिसांनी पाहिले. प्रसंगावधान दाखवून त्यांनी पोलिसांच्या ट्रँकरमधून पाणी फवारा करून आग भडकू दिली नाही.

अग्निशामक पथकही आले. वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ट्रकमध्ये ६५ पोती खाद्य भरले होते. दोन पोती खाद्याचे नुकसान झाले. ट्रकचेही किरकोळ नुकसान झाले. पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलिसांची मोठी कुमक आली. अग्निशामक दलाच्या पथकाने पाण्याचा फवारा करून आग भडकू दिली नाही. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमाराला हा प्रकार घडला.

पोलिस उपायुक्त अश्विनी सानप यांच्या बंगल्यात करीम शेख कामास आहेत. तर हेमंत वाघमारे वाहनांवर आरटीपीसी आहेत. सायंकाळी दोघेजण बंगल्यातून बाहेर चहा पिण्यासाठी पडले होते. समोरून जाणाऱ्या ट्रकमधून धूर येत असल्याचे दिसले. इशारा करून ट्रक थांबवला. दरम्यान बंगल्यात पाणी भरण्यासाठी पोलिसांचा ट्रँकर आला होता. त्याने पाणी फवारण्यात आले. लगेच आलेल्या अग्निशामक पथकाने आग भडकू दिली नाही. चौकात कामवर असलेले वाहतूक पोलिस कर्मचारी पवार, मालूमतकर मदतीस आले. सदर बझार पोलिसांच्या ताब्यात तो ट्रक दिला आहे. चौकशी करून पुढील कार्यवाही करतील, असे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के म्हणाले. कोंबडी खाद्य घेऊन ट्रक हाॅस्पेटकडे नेत असल्याची माहिती चालक विठ्ठल म्हेत्रे (रा. सोरेगाव) यांनी दिली. चालक केबीन आणि खाद्य पोतींचे थोडे नुकसान झाले आहे.