आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरजवळ दोघांचा दगडाने ठेचून निर्घृण खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तुळजापूर तालुक्यातील दोघांचा दगडाने ठेचून खून झाल्याचे रविवारी मध्यरात्री उघडकीस आले. हैदराबाद रस्त्यावरील मुळेगावच्या वळणावर असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. सुनील उर्फ नागनाथ लक्ष्मण गुंड (वय 36) व आबू उर्फ लक्ष्मण मोतीराम देवकर (वय 45, दोघे रा. सुरतगाव, तुळजापूर) अशी मृतांची नावे आहेत.

खिशातील कागदपत्रांवरून या दोघांची ओळख पटली. मध्यरात्री 2.30 ते 3.00 च्या सुमारास हा प्रकार घडला असून रात्री गस्तीच्या वेळी पोलिसांना त्यांचे मृतदेह दिसून आले.

दोन मुले पोरकी
सुनील गुंड सावरगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लक्ष्मण देवकर शेतकरी आहेत. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. दोघांचीही मुले पोरकी झाल्यामुळे शासकीय रुग्णालयात आणि त्यांच्या सुरतगावात हळहळ व्यक्त केली जात होती.