आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two New Train At Solapur, Yashwantpur Jaipur Yashwatpur Garib Rath

सोलापूरहून दोन नव्या गाड्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- यशवंतपूर-जयपूर-यशवंतपूर गरीब रथ साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरकरांना थेट जयपूरला जाण्यासाठी चांगली सोय झालेली आहे.

गरीब रथ 6 जानेवारीपासून सुरू झाली असून, ती 23 जूनपर्यंत चालणार आहे. ही गाडी दर रविवारी यशवंतपूर स्थानकावरून सायंकाळी 5 वाजून 20 निघेल. विजापूर या स्थानकांवर थांबा घेऊन सोलापूरला रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल. 10 मिनिटांचा थांबा घेऊन ती पुन्हा जयपूरला रवाना होईल. कुर्डवाडी, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, आदी स्थानकांवर थांबा घेत जयपूरला दर मंगळवारी पहाटे 4 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल.

गाडी क्रमांक 06512 ही गाडी जयपूरहून 8 जानेवारीपासून सुरू झाली असून, ती 25 जूनपर्यंत धावणार आहे. ही गाडी जयपूरहून दर मंगळवारी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी निघणार आहे. ती बुधवारी सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी सोलापूरला पोहोचेल. यशवंतपूरला ती गुरुवारी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीस 18 डबे जोडण्यात आलेले आहेत.

सिकंदराबाद-लोकमान्य सुपरफास्ट
सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) साप्ताहिक सुपरफास्ट गाडी सुरू झाली असून ती 27 जानेवारीपर्यंत धावणार आहे. ती दर रविवारी सिकंदराबादहून रात्री 10 वाजता सुटेल. सोलापूरला पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. 10 मिनिटांचा थांबा घेऊन ती पुढे निघेल. सोमवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी कुर्ला येथे पोहोचेल. ही गाडी कुल्र्यावरून सिकंदराबादसाठी दर सोमवारी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी निघेल. सोलापूरला पहाटे 5 वाजून 56 मिनिटांनी पोहोचेल. येथे 5 मिनिटांचा थांबा घेत पुन्हा सिकंदराबादला जाईल. ती मंगळवारी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीस 14 डबे आहेत.

इंद्रायणीला झाला एक तास उशीर
पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस गुरुवारी एक तास उशिरा आली. दुपारी दीडला येणे अपेक्षित असताना ती अडीचला पोचली. सुपरफास्ट गाड्यांना तासाचा विलंब लागण्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. इंद्रायणी एक्स्प्रेस मुंबईहून सकाळी सहाला पुण्याकडे सुटते. पुणे स्थानकावर 9 वाजून 15 मिनिटांस पोचून 9 वाजून 30 मिनिटांनी सोलापूरला निघते. गुरुवारी तांत्रिक कारणामुळे तिला मुंबईहून निघण्यास उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. त्याचा परिणाम पुणे व सोलापूरच्या वाहतुकीवर झाला.