आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबच्या दोघा तरुणांसह सोलापूरचा सराफ अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मागील शनिवारी शिवाजी प्रशालेजवळ एका तरुणीच्या गळय़ातील सोनसाखळी हिसकावणार्‍या दोन पंजाबी तरुणांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दागिने घेतल्याप्रकरणी एका सराफ व्यापार्‍यालाही अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विक्रम परमजित ठाकूर (वय 30, जयस्वालनगर, पुरानी जंगी, अमृतसर), देवेंद्र पगवंतसिंग बब्बर (वय 23, सुलतानीवंडपिंड, बोर्डवाले गल्ली, अमृतसर) या दोघांसह त्यांच्याकडून सोनसाखळी विकत घेतल्याप्रकरणी विडी घरकुल, कुंभारी येथील ज्वेलर्स व्यापारी अंबादास मुकेश सुंकी यांनाही अटक झाली. तिघांना मंगळवारी न्यायाधीश ए. ए. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर सात फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

परिमीता प्रकाश पुकाळे (रा. मुरारजी पेठ) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली होती. त्या मागील शनिवारी पवार प्रशालेजवळून जाताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली होती. त्यावेळी त्यांनी दुचाकीचा क्रमांक (एमएच 13 बीई 1997) पाहिला होता. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश हांडे, मच्छिंद्र जाधव, अप्पासाहेब पवार, राजकुमार तोळणुरे, लक्ष्मण खरात, सुरेश जमादार हे पथक दुचाकीचा शोध घेत होते. सोमवारी रात्री त्यांना नवी पेठेत गाडी दिसली. पोलिसांना पाहून ते पळूलागले. नामदेव चिवड्यासमोर पाठलाग करून त्यांना पकडले. चौकशीदरम्यान दोघांनी चोरीची कबुली दिली. दागिनेही हस्तगत केले.