आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुळे सोलापुरातील जानकी नगरात दोन तोळ्यांचे मंगळसूत्र पळवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जुळे सोलापुरातील जानकी नगरातून पायी जाताना सत्यवती अरुणकुमार इंगळे (रा. दत्त नगर, जुळे सोलापूर) यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरांनी हिसकावले. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमाराला घडली असून सोमवारी विजापूर नाका पोलिसांनी माहिती दिली आहे. श्रीमती इंगळे जगदीश मंगल कार्यालयातून जानकी नगराकडे पायी जात होत्या. दुचाकीवर आलेल्या दोघा तरुणांनी मंगळसूत्र हिसकावले.
रिक्षातील सहप्रवाशाचा चोरांनी मोबाइल पळवला
रंगभवनते सात रस्ता मार्गावर रिक्षातून प्रवास करताना प्रशांत रजपूत (रा. लष्कर) यांचा तेरा हजारांचा महागडा मोबाइल चोरांनी पळवला. चोरटे रिक्षात सहप्रवासी होते. ही घटना शनिवारी घडली असून सोमवारी सदर बझार पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. पँटच्या खिशातून मोबाइल काढून घेण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...