आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार - आयशरच्या अपघातात विदर्भातील दोन वारकर्‍यांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - श्री विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या दिंडीतील दोन वारकर्‍यांवर गुरुवारी काळाने घाला घातला. पंढरपूरपासून दोन किलामीटर अंतरावर कार व आयशर या दोन वाहनांत झालेल्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला तर अन्य दहा वारकरी गंभीर जखमी झाले. दिंडीतील वारकरी हे वर्धा, अमरावती व अकोला येथील आहेत.

आषाढी यात्रेसाठी कौंडल्यापूर (ता. तिवसा, जि. अमरावती) येथील रुक्मिणीमाता संस्थेची पायी दिंडी पंढरीकडे निघाली होती. यात सुमारे 150 वारकरी सहभागी झाले होते.

आढीव विसावा येथे विसावा घेऊन ही दिंडी पंढरीकडे निघाली होती. याच वेळी कुर्डुवाडीकडे निघालेला आयशर अँकर आणि कारचा तीनरस्ता परिसरापासून एक किलोमीटरवर अपघात झाला. अपघातानंतर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूने चालणार्‍या दिंडीत घुसली. त्यात उमेश मारुतराव बावनथडे (वय 26, रा. मार्डी, अमरावती), इंदुमती धोत्रे (वय 50, रा. मार्डी, अमरावती) यांचा मृत्यू झाला. तर इतर दहा जण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक प्रशांत कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप जाधव शहराचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या तीन वारकर्‍यांवर पंढरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावरच काळाने घाला घातला.