आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरणाऱ्या चौघांसह १२ जणांना झाली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - पंढरपूर तालुका पोलिसांनी मोटारसायकली चाेरणाऱ्या चार जणांच्या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून नऊ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या ३० मोटारसायकली जप्त केल्या. संशयित चारही आरोपी पंढरपुरातील रहिवासी आहेत.नामदेव बबन चुनाडे, नितीन निवृत्ती ननवरे, प्रशांत नवनाथ पिसाळ युवराज अनिल काळे अशी त्यांची नावे आहेत. तसेच, चोरीच्या गाड्या विकत घेऊन त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या आणखी आठ संशयितांनाही अटक केली. सर्व १२ संशयितांना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. हस्तगत केलेल्या एकाही गाडीवर आरटीओने दिलेला मूळ क्रमांक नसल्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले. इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरीच्या मोटारसायकली मिळवण्याची तालुक्यातील आतापर्यंतची पहिलीच कारवाई असल्याचा दावा पाेलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

पोलिसांनी असा काढला चोरांंचा माग
अजित गोरख बनकर (रा.वेळापूर, ता.माळशिरस) यांनी २१ जून रोजी मोटारसायकल (एम एच ४५ पी २५६१) चोरीला गेल्याची फ‍िर्याद दिली. त्यांच्या चुलत्यांची भंडीशेगाव येथून गाडी चोरीला गेली. त्याचा तपास करताना पोलिसांच्या रेकॉर्डवरील नामदेव चुनाडे (रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) याच्याकडे ही चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत नितीन ननवरे, प्रशांत पिसाळ युवराज काळे (सर्व रा. झेंडे गल्ली) या तीन साथीदारांची माहिती मिळाली आणि टोळीचा माग लागला.
३० जप्त गाड्यांसह कारवाई करणारे पोलिस पथक.

यांनी खरेदी केल्या गाड्या
संशयितचौघांच्या चौकशीत राजेश ऊर्फ पिंटू गंगाराम बरगडे (वय २२, रा. नातेपुते), संजय विठ्ठल शिंदे (३०, नातेपुते), दादा महादेव खताळ (३५, खताळ वस्ती, लोणंद, ता. माळशिरस), परमेश्वर मोहन घंटी (२५, पंढरपूर), विशाल वामन कोळी (२५, भोसे, ता. मंगळवेढा), सतीश संभाजी यादव (२१, बुर्दापूर, ता. अंबेजोगाई, जि. बीड), हनुमान जगन्नाथ सावंत, परमेश्वर बाबूराव सावंत (दोघेही २३, उखळी, ता. सोनपेठ, जि. परभणी) यांना गाड्या विकल्याचे सांगितले. या आठ जणांनी गाड्या विकत घेऊन त्यांची विल्हेवाट लावल्याचे समोर आले.
बातम्या आणखी आहेत...