आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव , राज ठाकरे यांनी एकत्र यावे - रामदास कदम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा फडकवणे हे शिवसेना प्रमुखांचे अखेरचे स्वप्न होते. उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन त्यांचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी व्यक्त केले.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी कदम सोमवारी पंढरपुरात होते. शासकीय विर्शामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता. मात्र, त्या वेळी राज ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. हा त्यांचा कौटुंबिक मुद्दा असल्यामुळे त्यांनी घरात एकत्र बसून सामोपचाराने मार्ग काढावा, अशी अपेक्षा कदम यांनी व्यक्त केली.भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना कदम म्हणाले, तो टिनपाट माणूस आहे. आदित्य ठाकरे हा वाघाचा नातू आहे. योग्य वेळी तो भास्कर जाधव यांना आपल्या पंजाचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीकडे सिंचन घोटाळ्यामधील अमाप पैसा आहे. पैशांच्या जोरावर ते इतर पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते फोडण्याचे काम करत आहेत.


शिवसेनेतच राहणार
मध्यंतरी आपण शिवसेनेमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती, असे विचारले असता कदम म्हणाले, की हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांचा उपद्व्याप होता. मी शिवसेनेतेच राहीन. माझा मृतदेह भगव्या झेंड्यातूनच जाईल.