आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Comment On Narayan Rane, Solapur

नारायण राणेंचा बोर्‍या वाजला; उद्धव ठाकरेंची आघाडी सरकारवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- ‘मागील 15 वर्षात सिंचनावर अमाप पैसा खर्च झाला, पण त्याचा परिणाम दिसत नाही. सत्ताधार्‍यांनी सिंचनाच्या पैशाने आपल्या तुंबड्या भरल्या. गरिबांचे जीवन उद्ध्वस्त करणारे हे आघाडी सरकार सत्तेवरून खाली खेचा व आपल्या भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी शिवशाहीचे सरकार सत्तेवर आणा,’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बार्शीतील सभेत केले. ‘राणेंचा बोर्‍या वाजला असून अशा लोकांची नावे जरी घेतली तरी तोंड विटेल,’ अशी टीकाही केली.

शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘हिंमत असेल तर अशा विराट जनतेच्या मधोमध उभा राहून सभा घेऊन दाखवा,’ असे आव्हानही उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते रामदास कदम, खासदार रवी गायकवाड आदी उपस्थित होते.

उद्धव म्हणाले की, ‘सत्ताधारी नेते सुडाचे व आकसाचे राजकारण करत आहेत, परंतु त्यांच्या सातच काय सातशे पिढ्या जरी उतरल्या तरी तुम्हाला गाडून विधानसभेवर भगवा फडकाविल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत.’

धरण हवे की हिलस्टेशन?
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. धरणाअभावी शेती ओस पडत असताना पवार आणखी 26 लवासा उभी करण्याची भाषा करत आहेत. प्राधान्य कशाला धरणाला की हिलस्टेशनला? असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला.