आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठास यूजीसीकडून मंजूर 2.80 कोटी मिळाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाला यूजीसीकडून मंजूर झालेल्या 7 कोटी निधीपैकी पहिल्या टप्प्यातील 2.80 कोटीचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. यातून विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी सांगितले.

लायब्ररी आणि संकुलातील विद्यार्थ्यांसाठी संगणक खरेदीसाठी 50 लाख, विविध प्रयोगशाळेतील शास्त्रीय उपकरणे खरेदीसाठी 30 लाख, परीक्षा विभागासाठी मुख्य सर्व्हर आणि लाइन प्रिंटरसाठी 7 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक शास्त्र संकुलावरील मजल्यावर 200 आसनक्षमतेचे ऑडिटोरियम, पाचशे एकर जागेवर 400 मीटरसाठी ट्रॅक बनविणे, विद्यापीठ कॅण्टीनची खास सोय करणे, मुला- मुलींच्या वसतिगृहासाठी कॉमन रूममध्ये विविध सुविधा, व्यायामाची साधने यासाठी उर्वरित निधी असेल. एकूणच यूजीसीच्या मंजूर निधीपैकी विद्यार्थी सुविधांना प्राधान्य मिळाल्याने येत्या काळात विद्यार्थीभिमुख विद्यापीठ संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून येईल.