आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी धरणात पाणी येण्यास झाली सुरुवात, 3 % वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उजनी व परिसरात वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरणातील जलसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. विशेष म्हणजे पुणे परिसरातील धरणे वजा पातळीतच असताना उजनीतील वाढ सोलापूरकरांना दिलासा देणारी ठरली आहे. वजा 27 टक्क्यावर गेलेले उजनी धरण बुधवारी रात्रीपर्यंत वजा 24 टक्क्यापर्यंत आले होते.

उजनी धरणाच्या परिसरातील पावसाने जलसाठय़ात वाढ होऊ लागल्याने सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. येणार्‍या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहील व उजनी धरणातील जलसाठा समाधानकारक राहील, असे सध्याचे वातावरण आहे. पुणे धरणीतल जलसाठय़ात फारसा फरक पडलेला नाही. पाऊसही म्हणावा तसा नाही. त्यामुळे उजनी धरणाबाबत चिंतेचे वातावरण होते. अजूनही पुण्यातल्या पावसाकडे सोलापूरकरांचे डोळे लागून राहिले आहेत.

पुणे व दौंड परिसरात बुधवारी सहा मिमी इतका पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांतही हीच स्थिती होती. त्यामुळे उजनी धरणातील जलसाठय़ात रोज एक टक्क्याने वाढ होत आहे. 21 जुलैपर्यंत वजा 27 टक्क्यांवर गेलेले हे धरण आता हळूहळू अधिकच्या (प्लस) दिशेने जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. उजनीच्या लाभक्षेत्रातून सध्या सहा हजार क्युसेक्सने पाणी धरणात येत आहे. हे प्रमाण असेच राहिले तर हे धरण प्लसमध्ये येण्यास आणखी 24 दिवस लागतील. परंतु पुणे परिसरात आणखी दमदार पाऊस झाला तर उजनीतील पाणीपातळी झपाट्याने वाढेल, अशी माहिती उजनीचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी दिली.

जोर वाढल्यास महिना अखेर प्लसमध्ये
उजनीच्या पाणीपातळीत सध्या रोज 1 टक्क्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर आणखी वाढला तर या महिनाअखेरीस हे धरण प्लसमध्ये येणे अपेक्षित आहे. सध्या दौंड येथून पाच हजार क्युसेक्सने धरणात पाणी येत आहे. अजय दाभाडे, अधीक्षक अभियंता, उजनी
धरण व परिसरात चांगला पाऊस; पातळी वजा 24 टक्क्यांवर

धरण पाणी पातळी सध्याची टक्के
(मीटरमध्ये) पातळी
उपखोरे : घोड
पिंपळगांव जोग 682.00 00 0
माणिकडोह 690.00 32.35 11.23
येडगांव 635.98 7.37 10.56
वडज 708.20 4.49 13.56
दिंबे 695.45 65.09 18.39
घोड 540.14 00 00
विसापूर 600.32 0.19 0.74
उपखोरे : भीमा
कलमोडी 681.20 28.70 67.26
चासकमान 634.60 35.67 16.63
भीमाअसखेड 662.85 105.33 48.51
वडीवले 525.50 7.14 23.49
आंध्र 607.40 42.16 50.95
उपखोरे : मुळा-मुठा
पवना 604.42 85.06 35.30
कसरसाई 619.30 4.66 29.02
मुळशी 596.52 178.36 34.10
टेंभघर 683.30 27.02 25.73
वरसेगाव 618.50 85.15 23.45
पानशेत 616.18 76.50 25.36
खडकवासला 580.77 34.03 60.87
दमदार पावसाची गरज
वरची धरणे रिकामीच
-4.02%
तेव्हाची टक्केवारी
गेल्यावर्षी याच दिवसाची स्थिती
490.10
मीटर पाणी पातळी
उजनी धरणातील पाण्याची आजची स्थिती
-24.45%
आजची टक्केवारी
488.962