आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उजनी’तून 70 हजार क्युसेक्सचा विसर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुणे जिल्हा व धरण परिसरात सलग तीन दिवस झालेल्या पावसाने उजनी धरणातील विसर्ग 20 हजारांवरून थेट 70 हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे धरणाचे 16 दरवाजे दीड मीटरने उचलण्यात आले आहे. पुणे भागातून पाण्याचा प्रवाह वाढल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याचा अंदाज लाक्षक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी व्यक्त केला. पुणे परिसरात आणखी पाऊस झाल्यास येत्या दोन दिवसांत विसर्ग लाखाच्या वर जाईल. उजनी धरण शंभर टक्केपेक्षा अधिक भरल्याने नदीत अधिकाधिक पाणी सोडण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

नदीकाठी दक्षता
एकही पूल पाण्याखाली जाणार नाही. दीड लाख क्युसेक्सचा प्रवाह सोडल्यास काही ठिकाणी वाहतुकीला अडचण येणार आहे. त्यादृष्टीने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’’ डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी

कुरनूर धरण 55 टक्के
अक्कलकोटला बोरी व हरणा नदीतून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने कुरनूर धरणात पाणी वाढले आहे. धरण 55 टक्क्यांवर आले आहे. अकलूज येथे गेल्या पाच वर्षांपासून कोरडी असलेली नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील बहुतांश ओढे, नाले, बंधारे, शेततळी पहिल्यांदाच भरून वाहत आहेत.