आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ujani Water Pipe Line Issue At Solapur, Diyv Amarathi

उजनी जलवाहिनी लांबोटीजवळ फुटली, लष्कर, शास्त्रीनगरात दूषित पाणीपुरवठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला पाणीपुरवठा करणार्‍या उजनी जलवाहिनीला लांबोटीजवळ मोठी गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. शहरातील पाणीपुरवठय़ावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. रविवारी जलवाहिनी दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी व मंगळवारी शहराला उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीसाठी शनिवारी तयारी करून रविवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी उजनी पंप हाऊस बंद करावा लागणार आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून बाहेर पडलेल्या पाण्याचे प्रमाण इतके मोठे होते की, जलवाहिनीलगत असलेल्या सहाजणांची शेती पाण्याखाली गेल्याचे दिसून आले.