आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ujwala Shinde Speak In Rally At Solapur, Divya Marathi

खोटे बोलण्यात भाजप पटाईत, उज्ज्वला शिंदे प्रचारसभेत टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट- देशात मोदी फॅक्टर दिशाभूल करणारा असून, भारतीय जनता पक्ष हा खोटे बोलण्यात पटाईत असलेला पक्ष असल्याची टीका करत काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नसल्याचे मत काँग्रेसच्या नेत्या उज्ज्वला शिंदे यांनी व्यक्त केले. अक्कलकोट येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठय़ा प्रमाणात विकासकामे केल्याचे सांगितले.

या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आनंदराव देवकते, राजशेखर शिवदारे, अँड. सी. बी. पाटील, अश्पाक बळोरगी, डॉ. सुवर्णा मलगोंडा, राजीव क्षीरसागर, दिलीप सिद्धे, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, दक्षिणच्या सभापती इंदुमती अलगोंडा, उपसभापती अप्पा धनके, नगरसेविका अनिता खोबरे, पंचायत समिती सदस्य स्वाती नारायणकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर माळशेट्टी, डॉ. साधना उगले, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुरेखा पाटील, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सुनीता हडलगी आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक अरुण जाधव यांनी केले.