आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमा चित्रपटगृहाला ५० वर्षे, पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता ‘संगम’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - (कै.)शंकरराव भागवत यांनी १९३० च्या सुमारास थिएटर व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. प्रथम चित्रमंदिर, त्यानंतर छायामंदिर आणि कलामंदिर सुरू केले. १९५४-५५ मध्ये उमामंदिरच्या बांधकामास सुरुवात झाली. अतिशय दर्जेदार, मजबूत आणि कलात्मक अशा या चित्रपटगृहाचे बांधकाम तब्बल १० वर्षे चालले. १४ नोव्हेंबर १९६४ रोजी ‘संगम’ या चित्रपटाने हे थिएटर सुरू झाले. उद््घाटनासाठी राज कपूर आणि राजेंद्रकुमार, संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतले जयकिशनजी, गीतकार हसरत जयपुरी आदी आले होते. त्या सुवर्ण क्षणाचा शुक्रवारी सुवर्णमहोत्सव आहे.

राज कपूर, राजेंद्रकुमार दोघेही ‘संगम’चे मुख्य कलाकार. त्यांना पाहण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती. पांजरपोळ चौकातून उघड्या कारने ते निघाले. रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची प्रचंड गर्दी होती. त्यांच्या दिशेने पुष्पहार येत होते. ते झेलत दोन्ही कलावंत हात उंचावून प्रेक्षकांना अभिवादन करत होते. थिएटरात गेल्यानंतर बाहेर प्रचंड जनसमुदाय चाहत्यांच्या नावाने ओरडत होता.

कपूर बोलले मराठीतून
उद््घाटनाच्याकार्यक्रमात राज कपूर यांनी चक्क मराठी सूर आळवून मराठी प्रेक्षकांना धक्काच िदला. या शानदार सोहळ्यानिमित्त बिस्मिल्ला खान यांच्या शहनाई वादनाचा कार्यक्रम झाला. शकिलाबानो भोपाली यांचा कव्वालीचा आणि सिद्राम जाधव यांच्या सुंद्रीवादनाचा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे संगीतकार जयकिशन यांनी आपल्या सुरेल आवाजात एक गीत गाऊन रसिकांना तृप्त केले.

सुवर्ण महोत्सव
सुवर्णमहोत्सवी सोहळा पुढच्या वर्षी माझेवडील उमाकांत भागवत यांनी उमा मंदिरचे बांधकाम केले. त्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात थिएटरच्या नूतनीकरणाचे काम करायचे आहे. त्यामुळे सांगता सोहळा पुढच्या वर्षी थिएटरमध्ये करण्याचा संकल्प आहे. भरतभागवत, उमामंदिरचेमालक

अजूनही आठवतो कपूर यांचा चेहरा
राजकपूर यांचा लालबुंद चेहरा, निळेशार डोळे पाहून आम्हा चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले. राजेंद्रकुमारही तितकेच सुंदर. हा चित्रपट पाहण्यासाठीही तेवढीच झुंबड होती. सुभाषपाटील, सुवर्णक्षणाचेसाक्षीदार