आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत कत्तलखाने, मनपाची धाडसी कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहरात वर्षानुवर्षापासून अनधिकृत कत्तलखाने सुरू आहेत. अशा कत्तलखान्यावर गुरुवारी सकाळी महापालिकेने धाडी टाकल्या. तेव्हा किडवाई चौक आणि लष्कर मुर्गी नाला परिसरातील कत्तलखान्यात ३६ जनावरे आढळून आली. ही जनावरे ताब्यात घेऊन मनपाने सोरेगाव येथील गोशाळेत हलवण्यात आली. मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले. राजकीय दबाव झुगारत त्यांनी ही धाडसी कारवाई केली.

शहरातील अनधिकृत कत्तलखान्याबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. गुरुवारी सकाळी आयुक्त गुडेवार यांनी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाला सोबत घेत कारवाईस सुरुवात केली. किडवाई चौकात वासरे बांधण्यात आली होती. ही जनावरे मनपाने ताब्यात घेतली.त्यानंतर लष्कर भागातील मुर्गी नाला परिसरात असलेल्या कत्तलखान्यावर कारवाई करण्यात आली. याठिकाणी बांधण्यात आलेल्या जनावरांसह सर्व साहित्यही जप्त केले. दोन्ही ठिकाणच्या कारवाईत मनपाने ३६ जनावरे ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेली जनावरे सोरेगाव येथील गोशाळेत हलविण्यात आली आहेत. या कारवाईत आयुक्त गुडेवार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विलास ढगे, सहाय्यक आयुक्त प्रदीप साठे, प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे, अतिक्रमण प्रतिबंधात्मक विभाग प्रमुख मोहन कांबळे आदींनी सहभाग घेतला.

आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून संभ्रम
आयुक्तांनाभेटायला शिष्टमंडळ आल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांचेही आगमन झाले. आयुक्त कक्षात बसलेल्या पत्रकारांना त्यांनी बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर बाहेर आल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना विचारणा केली असता पन्नास टक्के पाणी पट्टी कमी करण्याच्या विषयासाठी आल्याचे त्यांनी पत्रकारांना सांिगतले. यावेळी आमदार शिंदे आयुक्त यांच्यात पाणीपट्टी कमी करण्याबाबत चर्चाच झाली नसल्याचे समजते.

अनधिकृत कत्तलखाने बंद करण्यापूर्वी अधिकृत कत्तलखाना उभा करावा. तसेच हैदराबाद रोड येथे सुरु होण्यापूर्वीच बंद पडलेला कत्तलखाना उभारण्यासाठी महापालिकेने तसे प्रयत्न केले नाही. याबाबतही आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी माागणी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री यांनी केली.

कारवाई करू नये या मागणीसाठी शिष्टमंडळ भेटले
अनधिकृतकत्तलखान्यावर झालेल्या कारवाईनंतर नगरसेवक रफिक हत्तुरे, देवेंद्र भंडारे, फिरदोस पटेल, शौकत पठाण, हाजी अय्युब कुरेशी यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त गुडेवार यांची भेट घेतली. या प्रकरणी फौजदारी दाखल करू नये तसेच जनावरांना सोडावे, अशी मागणी केली. मात्र, गुडेवार यांनी जनावरे सोडणार नसल्याचे सांगितले. यापुढे असा प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याची तंबी गुडेवार यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. याशिवाय िशष्टमंडळाने अधिकृत कत्तलखाना सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन गुडेवार यांनी दिले.

विजापूर वेस, बेगम पेठ, किडवाई चौक, पेंटर चौक, साखर पेठ, शास्त्री नगर, बापूजी नगर, नई जिंदगी, लष्कर, फॉरेस्ट आदी भागात अनाधिकृत कत्तलखाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या भागातील कत्तलखाने बंद करण्याची मागणी येथील रहिवाशांतून होत आहे. कत्तलखान्यामुळे ड्रेनेज लाइन तुंबणे, घाण पाणी येणे असे प्रकार वारंवार होतात.

शहरात अनधिकृतपणे होणारी जनावरांची कत्तल थांबवण्यासाठी महापालिकेने २००५ मध्ये हैदराबाद रोड येथे दोन कत्तलखाने उभे करण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पासाठी दोन कोटी वीस लाख रुपये खर्च अपेक्षित होता. या दोन कारखान्यांसाठी मशीनही आल्या होत्या. मात्र, या कारखान्याला विरोध झाल्याने कारखान्याचे काम बंद पडले. मशिनरी चोरीला जात असल्याने त्यातील काही मशिनरी मनपा गोदामात हलवण्यात आल्या. िकती मशिनरी चोरीला गेल्या, याची माहिती नाही. हे कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
राजकीय दबाव झुगारून करण्यात आली कारवाई