आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Union Home Minister Sushilkumar Shinde At Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षरांशी नातं जोडा; जातीच्या भिंती पाडण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राजकीय कारणांपोटी अलीकडे जातीय शक्ती डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र जातीच्या भिंती पाडून अक्षरांशी नातं जोडणारी नवी जात निर्माण होणे गरजेचे आहे. आततायीपणा न करता विचारांचा लढा उभा राहिल्यास हे शक्य होईल, यासाठी आत्मचिंतन करणेही गरजेचे आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
दयानंद महाविद्यालयातील प्रा. डॉ. देवीदास गायकवाड लिखित ‘मराठी शोधप्रबंधाची वर्णनात्मक सूची’ या ग्रंथाचे प्रकाशन र्शी. शिंदे यांच्या हस्ते झाले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किलरेस्कर सभागृहात रविवारी सायंकाळी प्रकाशन सोहळा झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मराठी साहित्यिक वामन होवाळ होते.
श्री. शिंदे म्हणाले, कार्यक्रम स्वीकारला तेव्हा ऊर्जामंत्री होतो. आता गृहमंत्री म्हणून उपस्थित झालो. दलित समाजाचा प्रतिनिधी म्हणून जे मिळाले तेही कष्टाने. दयानंदमध्ये दगडू संभू शिंदे असेच माझे नाव होते. अँड. सुशील कवळेकर यांच्यासारखे व्हायचे होते म्हणून नाव सुशीलकुमार केले. जे भोगले, अनुभवले ते लपवण्याचे काही कारण नाही. सोनिया गांधींनी दलितवर्गाचे प्रतिनिधित्व म्हणून नवी जबाबदारी दिली. हे ‘पॉलिटिकल करेज’चे उदाहरण आहे. माझे तरुण पिढीला हेच सांगणे आहे, धडपड सोडू नका. आयुष्यात कष्टाशिवाय काही नाही. आंबेडकरी चळवळीत असूनही दलित साहित्याच्या परिघाबाहेर जात डॉ. गायकवाड यांचे लिखाण मराठी साहित्य संस्कृतीचाही आढावा घेते आहे. वेशीबाहेर राहणार्‍या समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा दलित साहित्यिक आज मानाने सरस्वतीचा दरबारात दाखल झाला आहे, ही बाब मला महत्त्वाची वाटते.
यांची होती उपस्थिती
प्रा. डॉ. देवीदास गायकवाड यांच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे, प्रा. डॉ. र्शीकांत येळेगावकर, ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, दयानंदचे प्राचार्य डॉ. र्शीनिवास वडगबाळकर, प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, प्रा. मीना गायकवाड, डॉ. विभा शहा, नगरसेवक अविनाश बनसोडे, डॉ. अच्युत माने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. येळेगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. कुलकर्णी यांनी आभार मानले. शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.