आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Minister Sushilkumar Shinde At Solapur

2014ची लोकसभा लढवणार, नंतर मात्र निवृत्ती- सुशीलकुमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 2014च्या निवडणुकांनंतर थांबण्याचे ठरवले आहे, असे सांगून आगामी लोकसभा लढवण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले.
श्रमिक पत्रकार संघात रविवारी वार्तालापात ते म्हणाले, कसाब व अफझलच्या फाशीबाबत गोपनीयता ठेवली नसती तर कुणी तरी न्यायालयात गेले असते, नाही त्या प्रकाराला तोंड द्यावे लागले असते. लवकरच गुजरातच्या सीमावर्ती भागाची पाहणी करणार असल्याचे सांगून ओडिशा, छत्तीसगड व झारखंडमध्ये नक्षली कारवाया कमी होत आहेत, असे ते म्हणाले. हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर ‘मी भूमिका मांडलेली आहे, त्यावर ठाम आहे.’ एवढेच उत्तर त्यांनी दिले. अधिक बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. भंडारा प्रकरणातही अत्यंत सावध भूमिका घेतली.