आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Union Home Minister Sushilkumar Shinde Calls Sharad Pawar His 'political Guru'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवार हे तर माझे राजकीय गुरू - सुशीलकुमार शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कॉँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये ‘नंबर टू’ वरून रस्सीखेच असली तरी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माझे राजकीय गुरू असल्याचे सांगून पवारांचा मोठेपणा मान्य केला.
शिंदे यांची नुकतीच गृहमंत्रीपदी व लोकसभेच्या नेतेपदी निवड झाली आहे. ‘तुमच्या या नियुक्तीला पवारांचा विरोध होता काय?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिंदे म्हणाले की, ‘पवारांनी राजकीय करिअर उंचावण्यासाठी नेहमीच मला मदत केली. ते कोत्या मनाचे नाहीतच. आपण लावलेले रोपटे ते कसे काय नष्ट करू शकतील? त्यामुळे सभागृह नेतेपदासाठी त्यांनी माझ्या नावाला कदापिही विरोध केलेला नाही. उलट शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी दोन वेळा फोन केला. या पदावर कोणाला बसवायचे हा कॉँग्रेसचा अंतर्गत प्रश्न होता, त्याचे पवारांना काहीच देणेघेणे नसल्याचेही शिंदेंनी स्पष्ट केले.