आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Venkaiah Naidu, Latest News In Divya Marathi

भाजपकडे सत्ता द्या, उद्योजकांची विमाने उतरतील, केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर,लातूर येथे विमानतळ आहे, पण विमाने कुठे आहेत? केवळ नेत्यांना ये-जा करण्यासाठी विसमानतळ असेल तर त्या शहराचा विकास कसा होईल? भाजपच्या हाती सत्ता द्या. याच विमानतळांवर उद्योजकांची विमाने उतरतील. औद्योगिक प्रकल्प साकारतील. रोजगार मिळेल. शहराचे वैभव वाढेल, अशी स्वप्ने केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी सोलापूरकरांना दाखवली. शुक्रवारी घोंगडे वस्ती भाजी मंडईत त्यांची सभा झाली. तेलुगु आणि हिंदी भाषेतून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना श्री. नायडू ग्रामीण कासमंत्री होते. तेव्हाच्या योजनांची माहिती देत त्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली. सोलापुरातील चारपदरी, सहापदरी रस्त्यांची कामे वाजपेयींच्या काळातील सुवर्ण चतुष्कोन योजनेतील आहेत. त्याने अनेक महानगरे जोडली गेली. वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पानंतर संवाद माध्यमांतही क्रांती केली.
काँग्रेसचे दुरून दर्शन
मोबाइल,रस्ते विकास आणि वाहिन्यांच्या विकासाचा आढावा घेत नायडू यांनी सारे श्रेय भाजपला दिले. काँग्रेसने केवळ दूरदर्शन एवढे एकच चॅनेल दिले. परंतु वाजपेयींच्या काळात आम्ही वाहिन्यांना परवाने दिले. त्यामुळेच आज ६०० वाहिन्या देशवासी पाहतात. काँग्रेसचे दुरून दर्शन होते आम्ही तर सर्वांचे दर्शन दिले, असे नायडू सांगताच एकच हशा पिकला.