आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महाविद्यालयांना विद्यापीठाची नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय व के. एन. भिसे महाविद्यालय (कुडरुवाडी) यांना सोलापूर विद्यापीठाने नोटिसा पाठवल्या आहेत. मेघालयाच्या सीएमजे विद्यापीठाकडून या महाविद्यालयातील प्रा. सत्यजित शहा व प्रा. नामदेव गरड यांनी पीएच.डी. पदवी आणली होती. मात्र, या दोन्ही महाविद्यालयांनी याबाबतची माहिती विद्यापीठापासून दडवून ठेवली व विद्यापीठाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. याबाबत वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार विचारणा विद्यापीठाने या महाविद्यालयांकडे केली आहे. या प्राध्यापकांवर 15 दिवसांत कारवाई करा, काय कारवाई केली त्याचा अहवाल विद्यापीठाला पाठवावा, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. सीएमजे विद्यापीठाच्या पदव्या बनावट असल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पंधरा दिवसांची मुदत
सीएमजे विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. मात्र, त्याबाबतची माहिती विद्यापीठाकडे पाठवली गेली नसल्याने हिराचंद नेमचंद वाणिज्य व के. एन. भिसे महाविद्यालय यांना 15 दिवसांत कारवाईबाबतच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.’’ डॉ. बी. एम. भांजे, प्रभारी कुलसचिव