सोलापूर - सोलापूरविद्यापीठाने विद्यार्थी हिताकडे लक्ष पुरवले आहे. येत्या तीन महिन्यांत विद्यापीठ परिसरात ‘वायफाय’ सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ‘वायफाय’ इंटरनेट सुविधेचा विद्यार्थ्यांना विद्यापीठ आवारात लाभ घेता यावा, यासाठी ‘पासवर्ड’ दिला जाईल. विद्यापीठ ग्रंथालयाचे संगणकीकरण करून यूजीसी इन्फोनेट, डेलनेट आदींची सेवाद्वारे ई-लायब्ररी कार्यान्वित केली असल्याचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी सांगितले. कुलगुरू म्हणून ११ डिसेंबर रोजी ते दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण करीत आहेत. याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कारकीर्दीचा लेखाजोखा मांडला.
सोलापूर विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, विकास आणि विस्तार ही चतु:सूत्री अंगीकारली आहे. इतर विद्यापीठांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. संकुलाचे रूपांतरण पुन्हा ३८ विभागांमध्ये होईल. यातून शैक्षणिक विकासाला चालना मिळेल. विद्यापीठातून उत्तम शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. या वेळी कुलसचिव िशवशरण माळी, बीसीयूडी संचालक डॉ. भीमाशंकर भांजे, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, एस. बी. अनपट, डॉ. रवींद्र चिंचोलकर उपस्थित होते.
परिसराचा विकास
विद्यापीठाच्या४८५ एकर परिसरात सुरक्षा भिंत, पाणी टाकी, क्रीडा संकुल आदी कामे करीत आहोत. परीक्षा केंद्रांना अॉनलाइन प्रश्नपत्रिका िदल्या. विद्यार्थिनींसाठी आणखी वसतिगृह उभारण्यात येईल. यासाठी कोटी १५ लाखांची तरतूद झाली आहे.
नॅक मूल्यांकनासाठी सज्ज
विद्यापीठास‘बारा ब’ची मान्यता मिळाली. १२ व्या योजनेतून मंजूर कोटींपैकी २.८ कोटींचा प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात नॅक समिती विद्यापीठाला भेट देऊन दर्जा प्रदान करणार आहे. रिक्त ५३ पदे भरण्यास शासन मान्यता मिळाली. इतर दहा प्राध्यापकांच्या रिक्त जागाही भरल्या जातील.
कुलगुरू डॉ. मालदार यांनी दोन वर्षांच्या कारकीर्दीचा मांडला लेखाजोखा