आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Will Be Taken Before The Test Session,

विद्यापीठ सत्र परीक्षा पूर्वीप्रमाणेच घेतल्या जाणार,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-सत्र परीक्षा पॅटर्न बदलवून विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेतलेल्या विद्यापीठाने अखेर माघार घेत नवीन स्वीकारलेली सेमिस्टर पद्धत रद्द केली असून पूर्वीप्रमाणेच सत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अनुषंगाने 18 जून 2013 रोजीचे परिपत्रक विद्यापीठाने रद्द केले आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
20 एप्रिल 2013 रोजी विद्या परिषदेने सत्र परीक्षा पद्धतीचा पॅटर्न एकतर्फी विचार करून बदलला होता. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगतच्या सत्र परीक्षेत त्या विषयाची परीक्षा देता येणार नव्हती. साहजिकच बहुतांश विद्यार्थ्यांनी या बदलाला विरोध केला. विद्यार्थी संघटना, इतकेच नव्हे तर काही प्राचार्य, प्राध्यापकांनी सत्र परीक्षेचा पॅटर्न बदलणे योग्य नसल्याचे म्हटले होते. आमदार प्रणिती शिंदे यांनीही पत्र दिले होते.
सत्र परीक्षेचा पॅटर्न बदलल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अडचणी उद्भवतील. त्यांचा परीक्षा देण्याच्या हक्कावर गदा येईल. हे लक्षात घेऊन सर्वप्रथम निवेदन दिले होते. विद्यापीठाने योग्य निर्णय घेतला. लहू गायकवाड, विद्यार्थी सेना
विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार विद्यापीठाने सत्र परीक्षा पॅटर्न पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. गणेश डोंगरे, शहराध्यक्ष, एनएसयूआय
कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून चांगला निर्णय घेतला. याचे स्वागत. प्रकाश नीळ, अधिविभाग विद्यार्थी प्रतिनिधी
मार्च 2014 या सत्रापासून परीक्षा पद्धत पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने घेतली जाईल. पदवी, पदव्युत्तर सर्व सत्राच्या परीक्षा वर्षातून दोन वेळेस होतील. डॉ. एस. व्ही. लोणीकर, प्र. परीक्षा नियंत्रक
पदवी सत्र एक ते सहा, पदव्युत्तर सत्र एक ते चार अशा सर्व सत्राच्या परीक्षा वर्षातून दोन वेळेस घेतल्या जातील. अभियांत्रिकी व विधी विद्याशाखा सत्र परीक्षा पद्धतीही पूर्वीप्रमाणेच असेल.
लागू करण्यात आलेली परीक्षा पद्धत
काय होती नवीन पद्धत
सत्र परीक्षा पद्धतीतील पदवी अभ्यासक्रमासाठी ऑक्टोबर सत्रामध्ये फक्त सेमिस्टर 1, 3, 5 व 6 तर मार्च सत्रामध्ये सेमिस्टर 2,4, 5 व 6 यांच्याच परीक्षा घेतल्या जाणार होत्या. अभियांत्रिकी व विधी शाखेला या निर्णयातून वगळले होते.
निर्णयात बदल