आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Untrained Employees Issue At Solapur Railway Station, Divya Marathi

गार्डच्या ड्युटीवर अप्रशिक्षित कर्मचारी; ‘सोलापूर रेल्वे’कडून जीवघेणा प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे गाडी सुरळीत धावण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी गाडीच्या गार्डवर असते. गार्डने दिलेल्या सूचना गाडीच्या चालकांना मान्य कराव्या लागतात. परंतु गार्ड्सची पदे रिक्त असल्यामुळे अन्य कामासाठीच्या अप्रशिक्षित कर्मचार्‍यांवर मालगाड्यांच्या गार्डची जबाबदारी अनेक दिवसांपासून देण्यात येत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे.
सोलापूर रेल्वे विभागात रोज साधारणपणे 200 मेल एक्स्प्रेस गाड्या आणि 50 ते 60 मालगाड्या धावतात. सोलापूर विभागात मालगाडीच्या गार्डची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रशिक्षित नसलेले पॉईंट्समन मालगाड्यांवर गार्ड म्हणून पाठवले जात आहेत. पॉईंट्समनच्या जिवावर गाडी चालवणे, हा भयंकर प्रकार आहे. यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोलापूर विभागातून धावणार्‍या मालगाड्यांवर रोज किमान 40 पॉईंट्समन गार्ड म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. प्रशासन रिक्त पदाची भरती करण्याऐवजी अप्रशिक्षित कर्मचार्‍यांच्या जिवावर वेळ मारून नेण्याचा प्रकार करत आहे. गार्ड आणि पॉईंट्समन हे दोघे परिचालन विभागातील कर्मचारी असले तरी त्यांची कामे वेगवेगळ्या प्रकारची आहेत. गार्ड हे वर्ग 3 मधील कर्मचारी असतात. त्यांना झोनल रेल्वे ट्रेनिंग सेंटरवर दीड महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते् तर पॉईंट्स्न हे वर्ग 4 मधील कर्मचारी असून, त्यांना विभागीय प्रशिक्षण केंद्रात 30 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. सोलापूर विभागात प्रशिक्षण केंद्र हे दौंडला आहे. तर मध्य रेल्वेचे झोनल प्रशिक्षण केंद्र भुसावळला आहे.