आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उर्दू घर’ला राज्य शासनाकडून मिळाले 5 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- येथील शासकीय रुग्णालयाच्या समोरील जागेवर बांधण्यात येणा-या ‘उर्दू घर’च्या उभारणीस राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने 4 कोटी 99 लाख 55 हजार 678 रुपये मंजूर केले. नांदेडनंतर राज्यात साकारणारे हे दुसरे उर्दू घर आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले होते.

सर्वाेपचार रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील 1701 चौरस मीटर जागेत (सर्वे क्रमांक 6172) उर्दू घर बांधण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने या जागेला मंजुरी दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने 26 फेब्रुवारी 2014 रोजी त्याचा प्रस्ताव तयार केला. अल्पसंख्याक विकास विभागाकडे तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी देताना विभागाने मंजूरपूर्व खर्चालाही मान्यता दिली. 2014-15 या आर्थिक वर्षाच्या कालावधीतील पहिल्या चार महिन्यांसाठी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. पैकी 11 लाख 16 हजार रुपयांच्या वितरणास मान्यताही देण्यात आली होती. त्यातून निविदा प्रक्रिया आणि प्राथमिक स्वरूपातील तातडीची कामे करण्यात यावीत, असे म्हटले होते. परंतु याच दरम्यान लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागली. त्यामुळे भूमिपूजनानंतर जागेवर काहीच करता आले नाही.

- उर्दू भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने उर्दू घरची संकल्पना पुढे आली.
अल्पसंख्यकांचा विकास हा उद्देशही आहे. राज्यात बांधण्यात येणारी उर्दू घरे बहुउद्देशीय आणि बहुपयोगी रचनेच्या इमारती असतील. सोलापुरातही सुंदर इमारत साकारली जाईल.
आरिफ नसीम खान, अल्पसंख्याक कल्याणमंत्री