आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \"Urdu Is My Friend\" Award Distribution In Solapur

उर्दू केवळ मुस्लिमांची नव्हे, तर समस्त भारतीयांची भाषा- शाहीद लतीफ यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उर्दूही मुस्लिमांची भाषा आहे, असा अपप्रचार करून उर्दू भाषा दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. वास्ताविक उर्दू ही समस्त भारतीयांची भाषा आहे. तिचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार शाहीद लतीफ यांनी केले.

अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीने "उर्दू दोस्त अवॉर्ड' यंदा मयूर इंडी यांना प्रदान करण्यात आला. रविवारी सायंकाळी बेरिया हॉल येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते.
लतीफ म्हणाले, ‘उर्दू शिकणाऱ्यांचा टक्का कमी आहे, हे खरे असले तरी तो वाढवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाहीत. उर्दूचे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची मानसिकता दिसत नाही.’ यावेळी महापौर सुशीला आबुटे, पक्षनेता संजय हेमगड्डी, स्थायी सभापती बाबा मिस्त्री, नदीम सिद्दीकी, सलीम मोहियोद्दीन, अ.रजाक रिंद, सिराज अहमद सिराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘दिव्य मराठी’चे बातमीदार म.युसूफ शेख यांना राज्य सरकारचा पुरस्कार िमळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रस्तावना अॅड. यू. एन. बेरिया यांनी केली. अश्पाक सातखेड यांनी सूत्रसंचालन केले.

उर्दूत सभ्यता नि गोडवा
सत्कारमूर्तीइंडी म्हणाले, ‘मी सिद्धेश्वर इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी. चौथीत असताना उर्दूची आवड निर्माण झाली. तेव्हापासून शिकू लागलो. उर्दू सर्वांची भाषा व्हावी, यासाठी माझे प्रयत्न आहेत. उर्दू भाषेत सभ्यता आणि गोडवा आहे. प्रत्येकांनी मुलांना उर्दूचे शिक्षण द्यायला हवे.’