आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कल की सुबह हमारी राह देखती रहेगी'; उर्दू साहित्य पुरस्कारांचे थाटात वितरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- घरी आलेल्या पाहुण्याला गूळ अन् पाणी देण्याची संस्कृती विसरून पाणी विकण्याची वेळ आली आहे, माणूसच माणसाचा गळा चिरतो आहे, दुसर्‍यांच्या हृदयांना सहजपणे ठेच पोहोचवतो आहे. अशा स्थितीत एकीची, प्रेमाची हाक देणारे शायर गेले कुठे? माणसाचे जीवन बदलून टाकणार्‍या त्यांची शायरी गेली कुठे? त्यांनी लावलेले दिवे मालवले तर नाहीत ना..अशा शब्दांत ख्यातनाम शायर शमीम तारिक यांनी माणुसकीला साद घातली. ‘हम दिया जलातेही रहेंगे, कल की सुबह हमारी राह देखती रहेगी..’ असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्फी थिएटरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. यू. एन. बेरिया होते. आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्दू साहित्यात योगदान देणारे दिल्लीचे मुझफ्फर हनफी, मुंबईचे शमीम तारिक आणि सोलापूरचे एम. एम. शेख यांचा अनुक्रमे 51 हजार, 21 हजार आणि 11 हजार रुपये रोख, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तारिक पुढे म्हणाले, ‘देशातील मातीसाठी, देशवासीयांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, माणसांची हृदये जोडण्यासाठी शायरांनी मोठे काम केले. मनुष्याचे अवघे जीवनच बदलून टाकले; परंतु बदलत्या काळात त्यांचा विसर पडल्याने हीच माणसे एकमेकांना भिडली. हे चित्र बदलण्यासाठी शायर, फकीर, सुफी संत यांच्या विचारांची गरज निर्माण झाली. त्यासाठी उर्दू साहित्यिकांनीच पुढाकार घ्यावा.’

एम. एम. शेख यांनी उर्दू शिक्षणाच्या जुन्या आठवणी सांगितल्या. आम्ही शिकत होतो, त्या वेळी 200 विद्यार्थी आणि 11 शिक्षक होते. आज शहर आणि जिल्ह्यात ही संख्या वाढल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. अँड. बेरियांनी अध्यक्षीय भाषणात परिषदेच्या कार्याची माहिती दिली.

‘उर्दू घर’ लवकरच
सोलापुरात ‘उर्दू घर’ साकारण्याचे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आहे. हा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांसमोर असून, तो लवकरच मंजूर होईल, अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी या वेळी व्यक्त केली. ‘उर्दू घर’मधून अशी एक संस्था उभी राहावी.